खरिपाला अखेरच्या टप्प्यात मिळाला दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:16 AM2021-07-11T04:16:56+5:302021-07-11T04:16:56+5:30
तालुक्यातील काही मंडलामध्ये यापूर्वी पडलेल्या पावसावर शेतकऱ्यांनी पेरणी केली होती, त्या पिकांना आता दिलासा मिळाला आहे. यावर्षी खरिपाच्या दृष्टीने ...
तालुक्यातील काही मंडलामध्ये यापूर्वी पडलेल्या पावसावर शेतकऱ्यांनी पेरणी केली होती, त्या पिकांना आता दिलासा मिळाला आहे. यावर्षी खरिपाच्या दृष्टीने समाधानकारक पावसाची अपेक्षा सर्वत्र वर्तविली जात असतानाच काही गावांमध्ये दमदार पावसाने हजेरी लावली होती. मात्र बहुतांश गावात पेरणीयोग्य पाऊस न पडल्यामुळे बळीराजा चिंताग्रस्त होता. नुकताच तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये पेरणीयोग्य पाऊस पडल्यामुळे खरिपाची पेरणी यावर्षी उद्दिष्टपूर्ती गाठणार असल्याचे चित्र दिसत आहे.
---
शनिवारी नोंदलेला पाऊस
माळशिरस ३१ मिमी., सदाशिवनगर ४० मिमी., इस्लामपूर १५ मिमी., नातेपुते २० मिमी., दहिगाव १५ मिमी., पिलीव ३४ मिमी., वेळापूर ४२ मिमी., महाळुंग २२ मिमी., अकलूज ५९ मिमी., लवंग ६२ मिमी. असा एकूण ३४० मिमी. तर सरासरी ३४ मिमी. पावसाची नोंद झाली आहे.
-----
गारवाड येथे दमदार पावसामुळे रस्त्यावर साचलेले पाणी.