अक्कलकोट तालुक्यात खरीप पेरणी ५ टक्के पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:25 AM2021-07-14T04:25:56+5:302021-07-14T04:25:56+5:30

अक्कलकोट : तालुक्यात तूर, उडीद, मूग, सोयाबीन यासारख्या खरीप पिकाची पेरणी ९५ टक्के पूर्ण झाली आहे. आतापर्यंत ६२ ...

Kharif sowing completed 5% in Akkalkot taluka | अक्कलकोट तालुक्यात खरीप पेरणी ५ टक्के पूर्ण

अक्कलकोट तालुक्यात खरीप पेरणी ५ टक्के पूर्ण

Next

अक्कलकोट : तालुक्यात तूर, उडीद, मूग, सोयाबीन यासारख्या खरीप पिकाची पेरणी ९५ टक्के पूर्ण झाली आहे. आतापर्यंत ६२ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. तालुक्यात ५२०० हेक्टरवर सोयाबीन पेरणी झाली आहे.

सलग दोन वर्षे पावसाने साथ दिल्याने बळीराजा सुखावला आहे. मागील वर्षाप्रमाणे यंदाही सुरुवातीपासून पावसाने साथ दिल्याने जून महिन्यात मोठ्या प्रमाणात खरीप पिकाची पेरणी झाली आहे. खरीप पिकामध्ये प्रामुख्याने तूर, उडीद, मूग, सूर्यफूल, भुईमूग, सोयाबीन आदी प्रकारच्या पिकाची पेरणी झाली आहे. मागील वर्षाप्रमाणे यंदाही शेतक-यांना उत्पन्न समाधानकारक लाभणार आहे. बारा दिवस पाऊस झाल्याने पिके डोलू लागली आहेत.

विशेषतः वागदरी, घोळसगाव, किरनळ्ळी, चुंगी, किणी, किणीवाडी, हन्नूर, खैराट, गोगाव, भुरीकवठे या भागात सर्वाधिक सोयाबीन पिकाची पेरणी झालेली आहे. ५२०० हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे.

----

तूर, उडदाची लागवड सर्वाधिक

तूर-२८ हजार हेक्टर, उडीद-१५ हजार, मूग-६ हजार, सोयाबीन-५ हजार २५० हेक्टर, सूर्यफूल-२ हजार ३००, भुईमूग-१ हजार २०० आदी प्रकारच्या मिळून तब्बल ६२ हजार हेक्टर खरीप पिकाची पेरणी झाली आहे. एकूण ६५ आरक्षित क्षेत्रापैकी ६२ हजार क्षेत्रावर म्हणजेच ९५ टक्के पेरणी झाली आहे. तडवळ, करजगी भागात उशिरा व पुरेसा पाऊस न झाल्याने उशिरा खरीप पेरणी होत आहे.

---

तालुक्यात यंदाही समाधानकारक पाऊस झाला आहे. सध्या खुरपणी, कोळपणीला पिके आली असून शेतक-यांनी जमीन तणविरहित स्वच्छ ठेवण्याचे काम करावे. यामुळे रोगराई होणार नाही. याची काळजी घ्यावी. सोयाबीन वाढ चांगली होत आहे. उडीद फुलो-यात आहे.

- सूर्यकांत वडखेलकर

तालुका कृषी अधिकारी

Web Title: Kharif sowing completed 5% in Akkalkot taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.