माढ्यात रखडलेल्या खरीप पेरणीला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:16 AM2021-06-28T04:16:49+5:302021-06-28T04:16:49+5:30
कुर्डूवाडी : माढा तालुक्यातील कुर्डूवाडी, माढा, मोडनिंब, टेंभुर्णी, लऊळ, पिंपळनेर, मानेगाव, उपळाई, दारफळ, जामगाव, रोपळे या परिसरासह संपूर्ण तालुक्यात ...
कुर्डूवाडी : माढा तालुक्यातील कुर्डूवाडी, माढा, मोडनिंब, टेंभुर्णी, लऊळ, पिंपळनेर, मानेगाव, उपळाई, दारफळ, जामगाव, रोपळे या परिसरासह संपूर्ण तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सतत रिमझिम पाऊस पडत आहे. जमिनीत ओलावा खोलवर गेल्याने शेतकरी वर्गात आनंद निर्माण झाला आहे.
१५ दिवसांपूर्वी झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे खरिपाची पेरणी झाली होती. पावसाने ओढ दिली आणि कृषी विभागाच्या आवाहनाला साथ देत
शेतकऱ्यांनी पेरणी थांबवली होती, आता पुन्हा दोन दिवसांपासून भीज पाऊस पडल्याने येथील शेतकरी पेरणीबाबत सकारात्मक झाला आहे.
माढा तालुक्यात पंधरा पूर्वी मान्सूनपूर्ण पावसाने चांगली हजेरी लावली. लगेच खरिपाच्या पेरणीस प्रारंभ झाला होता. परंतु त्यानंतर पुन्हा पावसाने ओढ दिली. दरम्यानच्या काळात काही शेतात पहिल्यांदा पेरणी केलेली उगवण चांगली झाली, परंतु पावसाने ओढ दिल्याने ते जळून गेले. त्याठिकाणी आता या पावसामुळे दुबार पेरणी शेतकऱ्यांना करावी लागणार आहे.