सोलापूरची किर्ती भराडिया समुद्रात पोहण्याचा विश्वविक्रम करणार; श्रीलंका सरकारही करणार मदत
By Appasaheb.patil | Updated: March 9, 2023 17:15 IST2023-03-09T17:15:22+5:302023-03-09T17:15:22+5:30
किर्तीच्या या विश्वविक्रमात आता श्रीलंका सरकारही मदत करणार असल्याची माहिती सोलापूर जिल्हा होशी जलतरण संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत शेटे व किर्तीचे वडील नंदकिशोर भराडिया यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सोलापूरची किर्ती भराडिया समुद्रात पोहण्याचा विश्वविक्रम करणार; श्रीलंका सरकारही करणार मदत
सोलापूर : सोलापूरची किर्ती नंदकिशोर भराडिया ही श्रीलंका ते भारत रामेश्वर हो ३२ किलोमीटरचे अंतर समुद्रात न थांबता पोहून पार करणार आहे. यासाठी भारत सरकार बरोबरच श्रीलंका सरकारची ही परवानगी मिळाली आहे. किर्तीच्या या विश्वविक्रमात आता श्रीलंका सरकारही मदत करणार असल्याची माहिती सोलापूर जिल्हा होशी जलतरण संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत शेटे व किर्तीचे वडील नंदकिशोर भराडिया यांनी पत्रकार परिषदेत दिली.
श्रीलंकेतील तलाईमनार येथून १७ मार्चला पहाटे २ वाजता किर्ती समुद्रात उतरणार आहे. तिच्यासोबतच्या बोटीमध्ये तिचे जवळचे नातेवाईक आणि कोच तसेच डॉक्टरांचे पथक असणार आहे. १२ ते १४ तासात ती हे अंतर पार करून भारतात रामेश्वर धनुषकोडी येथै दुपारी दोन वाजता पोहोचणार आहे. श्रीलंका ते रामेश्वर हे अंतर ३२ किलोमीटरचा असलं तरी पोहताना तिरक्या पध्दतीने पुढे जावं लागत असल्याने हा प्रवास चाळीस किलोमीटरचा होणार आहे. यापूर्वी किर्तीनं पोहचण्याचे अनेक विक्रम केले आहेत. या पत्रकार परिषदेस अनिल सलगर, विश्वनाथ चिडगुंपी, किरण कोल्हापूर आदी उपस्थित होते.