घरात घुसून केले चाकूचे वार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:15 AM2021-07-19T04:15:48+5:302021-07-19T04:15:48+5:30
करमाळा : शहरात घरात घुसून एका जणाने चाकूने सपासप वार करून रंगकाम करणा-याचा खुनाचा प्रयत्न केला आहे. ...
करमाळा : शहरात घरात घुसून एका जणाने चाकूने सपासप वार करून रंगकाम करणा-याचा खुनाचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी जखमी राजेंद्र ऊर्फ सोमनाथ विठ्ठल कांबळे (वय ४०, रा. सुमंतनगर, करमाळा) यांनी फिर्याद दिली आहे.
१७ जुलै रोजी रात्री ९ वाजता सुमंतनगर परिसरात ही घटना घडली. या घटनेने एकच खळबळ उडाली.
पोलीस सूत्राकडील माहितीनुसार राजेंद्र हा रंगकाम करतो. शनिवारी रात्री ९ वाजता घरात टीव्ही पाहत बसला होता. इतक्यात राहुल मुळूक (वय २०, रा. चांदगुडे गल्ली, करमाळा) हा आला. त्याने हातातील चाकूने राजेंद्रच्या अंगावर वार करण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्याने मारहाणीचे कारण विचारले असता काही न बोलता तो उजव्या हाताच्या बगलेत, डाव्या हाताच्या दंडावर, डाव्या कानावर, गुडघ्यावर चाकूने वार करून जखमी केले. त्यानंतर तो चाकू घेऊन पळून गेला. त्यावेळी त्याच्या आईने आरडाओरडा केला. शेजारी राहणारे देवा लोंढे, नामदेव लोंढे यांना बोलावले. त्यांनी त्याला ॲम्ब्युलन्समध्ये घालून उपचाराकरिता उपजिल्हा रुग्णालय करमाळा येथे दाखल केले. या घटनेनंतर रोहित मुळूक फरार झाला.
अधिक पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक जगताप करत आहेत.
----
फोटो : १८ राजेंद्र कांबळे