चाकूचा धाक दाखवून लुटणारे चोरटे जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:15 AM2021-06-30T04:15:23+5:302021-06-30T04:15:23+5:30
पोलीस सूत्रांनुसार श्रीमंत मल्लिकार्जुन म्हेत्रे (वय ३५, रा. फ्लट नं. २१, बी विंग, मरकळ रोड, आळंदी) हे रविवारी पावणे ...
पोलीस सूत्रांनुसार श्रीमंत मल्लिकार्जुन म्हेत्रे (वय ३५, रा. फ्लट नं. २१, बी विंग, मरकळ रोड, आळंदी) हे रविवारी पावणे बाराच्या सुमारास पंढरपूर येथील चंद्रभागा नदीवरील पुलावरून (अहिल्या पूल) कारने चालले होते. अचानक मागून दुचाकीवरून दोन इसम म्हेत्रे याच्या कारला ओलांडून समोर आले. दुचाकी अडवी लाऊन म्हेत्रे यांना थांबविले. चाकूचा धाक दाखवून मोबाइल, बॅगेतील १३ हजार रुपये व पॅनकार्ड घेतले. घडला प्रकार कोणाला सांगितल्यास बघून घेऊ, अशी धमकी देऊन निघून गेले. याबाबतची तक्रार म्हेत्रे यांनी शहर पोलीस ठाण्यात नोंदवली होती.
यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, पाेलीस निरीक्षक अरुण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. राजेंद्र मगदुम यांनी तपास चक्रे फिरवली. या प्रकरणात नानासाहेब बाबासाहेब माेरे (वय ४५, रा. मुंढेवाडी, ता. पंढरपूर) व सचिन दादा खाडे (वय ४१, रा. उपरी, ता. पंढरपूर) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून मोबाइल फोन व गुन्ह्यात वापरलेले (एम.एच. १३ ए.क्यू ७८१०) वाहन जप्त केले.
ही कारवाई ही कामगिरी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनि राजेंद्र मगदुम, हवालदार शरद कदम, बिपीनचंद्र ढेरे, सुरज हेंबाडे, राजेश गोसावी, इरफान मुलाणी, पोलीस नाईक शोएब पठाण, इरपान शेख, महेश पवार, संजय गुटाळ, प्रसाद औटी, पोलीस सुनील बनसोडे, सुजित जाधव, समाधान माने यांनी केली.
----
मोबाइल विकण्यासाठी आले अन् सापडले
- नानासाहेब बाबासाहेब माेरे व सचिन दादा खाडे हे दोघे चोरीचा मोबाइल पंढरपूर येथे विकण्यासाठी आले होते. ही बातमी गुप्त बातमीदाराकडून मिळताच त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली, असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशांनी दोघांना दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली.