जाणून घ्या...का फेटाळली निमगावातील फेर मतदानाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 08:42 PM2019-04-24T20:42:45+5:302019-04-24T20:48:44+5:30
निमगाव (टे) येथे फेर निवडणूक घेण्याची भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक—निंबाळकर यांनी केली होती मागणी.
सोलापूर : निमगाव (टे) येथे फेर निवडणूक घेण्याची भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक—निंबाळकर यांनी केलेली मागणी फेटाळून लावण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी रामचंद्र शिंदे यांनी बुधवारी सायंकाळी लोकमतशी बोलताना दिली.
माढा लोकसभेसाठी मंगळवारी मतदान झाले. माढा तालुक्यातील निमगाव (टे) येथे मतदान सुरू असताना भाजपचे मतदान प्रतिनिधी कैलास आलदार (रा. बादलेवाडी) यांना तेथील मतदान केंद्र अधिकाºयाने हाकलून दिले. ही माहिती मिळताच प्रहारचे अतुल खुपसे प्रतिनिधीला घेऊन मतदान केंद्रावर आल्यावर तुझे इथे काय काम आहे असे म्हणून तेथील कार्यकर्त्यांनी प्रतिनिधीला पोलिसांच्या ताब्यात दिले.
याबाबत खुपसे यांनी धैर्यशील मोहिते—पाटील यांना माहिती दिली. त्यामुळे ते तेथे आल्यावर त्यांना मतदान प्रतिनिधी आढळून आला नाही. त्यामुळे त्यांनी चौकशी केली. उमेदवार संजय शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या प्रतिनिधिला दमदाटी करून हाकलून दिल्याची बाब समोर आली. याबाबत तहसीलदार व वरष्ठि अधिकाºयांकडे चौकशी केल्यावर हरकत नसल्याचे स्पष्ट केले.
भाजपच्या मतदान प्रतिनिधीला हाकलून दिल्याबद्दल उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर, धैर्यशील मोहिते—पाटील यांनी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात धाव घेतली. यावेळी उमेदवार नाईक—निंबाळकर यांनी घडल्या प्रकाराबाबत निवडणून आयोगाकडे तक्रार करणार असून, निमगावात फेरनिवडणुकीची मागणी करणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्या पार्श्वभूमीवर बुधवारी सोलापुरात निवडणूक निरीक्षक दाखल झाले. दिवसभर माण व खटाव विधानसभा मतदार संघातील मतपेट्या रामवाडी गोदामात आणण्याचे काम सुरू होते. सायंकाळी सर्व मतपेट्या दाखल झाल्यावर रामवाडी गोदाम सील करण्यात आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी शिंदे यांनी सांगितले.