Maharashtra Election 2019; जाणून घ्या...पालकमंत्री विजयकुमार देशमुखांची मालमत्ता आहे तरी किती !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2019 07:56 PM2019-10-04T19:56:00+5:302019-10-04T19:57:44+5:30

शहर उत्तर विधानसभा मतदारसंघ; वाहन व कोणतेही कर्ज देशमुखांच्या नावे नाही

Know ... Guardian Minister Vijaykumar Deshmukh's property, how much! | Maharashtra Election 2019; जाणून घ्या...पालकमंत्री विजयकुमार देशमुखांची मालमत्ता आहे तरी किती !

Maharashtra Election 2019; जाणून घ्या...पालकमंत्री विजयकुमार देशमुखांची मालमत्ता आहे तरी किती !

googlenewsNext
ठळक मुद्दे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्याकडे फक्त १० तोळ्यांचे दागिने अर्ज भरताना दाखल केलेल्या शपथपत्रात १२ कोटी ५५ लाख ८१ हजार ३४८ रुपयांची स्थावर व जंगम मालमत्ता

सोलापूर : पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज भरताना दाखल केलेल्या शपथपत्रात १२ कोटी ५५ लाख ८१ हजार ३४८ रुपयांची स्थावर व जंगम मालमत्ता असल्याचे नमूद केले आहे. देशमुख यांनी आपल्या नावे वाहन व कर्ज नसल्याचे स्पष्ट केले आहे. 

देशमुख यांनी आयकर विभागाला सन २०१५-१६ या वर्षासाठी ५ लाख ५० हजार ३०० रुपये उत्पन्न असल्याचे दाखविले आहे. त्यानंतर सन २०१६-१७ मध्ये ६ लाख ७२ हजार १०५ तर सन २०१७-१८ मध्ये १३ लाख ३४ हजार १४८ आणि सन २०१८-१९ मध्ये २७ लाख १७ हजार २५ रुपये उत्पन्न असल्याचे दाखविले आहे. चालू वर्षी म्हणजे सन २०१९-२० मध्ये हे उत्पन्न २९ लाख ८४ हजार ३६२ रुपये असल्याचे नमूद केले आहे. देशमुख यांच्याकडे रोख पन्नास हजार रुपये आहेत. तर पंजाब बँकेच्या बचत खात्यावर २ लाख नऊ हजार, स्टेट बँकेच्या खात्यावर एक हजार सहा रुपये, मुंबईतील खात्यावर नऊ लाख ५२९ रुपये आहेत. सिद्धेश्वर बँकेत ५५ हजार, फेडरलमध्ये तीन लाख ७२ हजार तर युनियन बँकेत २१०० रुपये आहेत. सिद्धेश्वर साखर कारखान्याचे २० हजार १०० रुपयांचे शेअर्स आहेत. अशाप्रकारे जंगम मालमत्तेचे मूल्य २४ लाख ६८ हजारांचे आहे. 

स्थावर मालमत्तेमध्ये मंद्रुपला १७ हजार ७७५ चौरस फूट बिनशेती जागा आहे. ही शेती त्यांनी ७ मे २००९ रोजी घेतली आहे. त्यावेळी या शेतीची किंमत १२ लाख होती, आता ३५ लाखांची झाली आहे. 

११ एप्रिल २०१७ रोजी देशमुख यांनी दक्षिण कसब्यामध्ये सर्व्हे नं. ६४० अ व ६४१/२ मधील दोन मिळकती १६ लाखाला खरेदी केल्या आहेत. आज या मिळकतींचे बाजारमूल्य २६ लाख इतके आहे. वारसा हक्काने बुधवारपेठ येथील खुली जागा त्यांच्या नावे आली आहे. त्याचबरोबर बुधवारपेठेत एक मजली व्यावसायिक इमारत, पाकणी येथे इमारत, रेल्वे लाईन्समध्ये निवास आणि अंधेरी येथील राजयोग हौसिंग सोसायटीत निवास आहे. अशाप्रकारे स्वत: घेतलेली ४ कोटी ९० लाख १८ हजारांची व वारसा हक्काने आलेली ७ कोटी ४० लाख ९४ हजार अशी १२ कोटी ३१ लाख १२ हजारांची स्थावर मालमत्ता आहे. 

दहा तोळ्यांचे दागिने
- पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्याकडे फक्त १० तोळ्यांचे दागिने आहेत. त्यांना कोणत्याही बँक किंवा संस्थेचे देणे नाही. तसेच त्यांच्या नावे कोणतेही वाहन नोंद नाही. बसवेश्वरनगर येथे नऊ एकर १५ गुंठे इतकी शेती व रविवार पेठेत ५३८.९५ चौरस फूट व बुधवारपेठेत ५३८० चौरस फूट खुली जागा त्यांच्या नावे आहे. 

Web Title: Know ... Guardian Minister Vijaykumar Deshmukh's property, how much!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.