माढा पंचायत समितीची कोल्हापूरच्या पथकाकडून तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:41 AM2021-02-06T04:41:03+5:302021-02-06T04:41:03+5:30
माढ्याच्या पंचायत समितीने पंचायत राज अभियानात सहभाग घेतला घेतल्याने तसा प्रस्ताव दाखल केल्यानंतर संबंधित पथकाकडून येथील विविध विभागातील कामांची ...
माढ्याच्या पंचायत समितीने पंचायत राज अभियानात सहभाग घेतला घेतल्याने तसा प्रस्ताव दाखल केल्यानंतर संबंधित पथकाकडून येथील विविध विभागातील कामांची तपासणी करण्यात आली. यात राज्य शासनाच्या मिळालेल्या निधीचा केलेला विनियोग, जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून राबविण्यात आलेल्या योजना, नवीन उपक्रम, नाविन्य पूर्ण योजना, ग्रामीण भागातील विकासकामे, प्रशासकीय यंत्रणेतील उपक्रम, अशा अनेक उपक्रम व कामांची यावेळी तपासणी करण्यात आली.
तपासणी पथकात कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई, सहायक राहुल मोरे, रजनीकांत कांबळे, आर. बी. जंगम, पाटणकर यांचा समावेश होता. या पथकातील सर्वांचे स्वागत सभापती विक्रमसिह शिंदे, गटविकास अधिकारी डॉ. संताजी पाटील, बांधकामचे अभियंता एस. जे. नाईकवाडी, सहायक प्रशासन अधिकारी सयाजी बागल, महेश शेंडे यांनी केले. यावेळी सर्व विभागाचे विभागप्रमुख उपस्थित होते.
फोटो
०५माढा०१
ओळ
कुर्डूवाडी येथील माढा पंचायत समितीच्या कार्यालयात विविध विभागांंची तपासणी करताना कोल्हापूरच्या उपमुख्य कार्यकारी मनीषा देसाई.