कोल्हापूर - धनबाद रेल्वेचे बार्शीत उत्साहात स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:35 AM2021-02-23T04:35:04+5:302021-02-23T04:35:04+5:30
यावेळी रेल्वे प्रवासी सेलचे अध्यक्ष शैलेश वखारिया, कनिष्क बोकेफोडे, पराग होतपेटी, रोहन वखारिया, संतोष नगरकर, आनंद वखारिया, अविनाश अग्रवाल, ...
यावेळी रेल्वे प्रवासी सेलचे अध्यक्ष शैलेश वखारिया, कनिष्क बोकेफोडे, पराग होतपेटी, रोहन वखारिया, संतोष नगरकर, आनंद वखारिया, अविनाश अग्रवाल, अशोक पटवा, किरण वखारिया, दिनेश तिवारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुणे, नगर, औरंगाबादमार्गे धावणारी ०१०४५ कोल्हापूर - धनबाद दीक्षाभूमी एक्स. १९ फेब्रुवारीपासून तिचा मार्ग बदलून पंढरपूर, कुर्डुवाडी, बार्शी, लातूरमार्गे धावू लागली. यामुळे या गाडीचा तब्बल ४०० किलोमीटरचा फेरा कमी झाला आहे. यामुळे वेळ आणि इंधन याची बचत होणार आहे. तसेच पंढरपूर, कुर्डुवाडी, बार्शी, लातूर या भागांतून उत्तर भारतात जाण्यासाठी ही गाडी खूप सोयीस्कर ठरणार आहे.
या गाडीची विशेषता म्हणजे, कोल्हापूर, पंढरपूर, बार्शी, परळी,नांदेड, नागपूर, अलाहाबाद, गया, सममेदशिखर अशी महत्त्वाची तीर्थक्षेत्रे या मार्गामध्ये येतात.
पूर्वी ही गाडी ४०० कि. मी. जास्त फिरून जात असल्याने प्रवासाची वेळ व प्रवासखर्च जास्त लागत असल्याने प्रवासी या गाडीला प्राधान्य देत नसत. ही गाडी साप्ताहिक असून, दर शुक्रवारी पहाटे ४.३५ वाजता कोल्हापूरहून निघून ९.३८ वाजता बार्शी व रविवारी सकाळी ८.३५ वाजता धनबाद (झारखंड) येथे पोहोचते. परतीच्या प्रवासासाठी धनबाद (झारखंड) वरून दर सोमवारी सकाळी १०.२० वाजता निघून बुधवारी सकाळी ६.३३ वाजता बार्शी व दुपारी १२.४० वा.जता कोल्हापूरला पोहोचते.