कोरेगाव भीमा हिंसाचार बाहेरच्यांनी घडवला, या बाहेरच्यांना सरकारने शोधावे - शरद पवार 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2018 06:21 PM2018-01-07T18:21:18+5:302018-01-07T18:24:31+5:30

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरण हे बाहेरच्या लोकांनी घडवले त्या बाहेरच्या लोकांना सरकारने शोधावे आणि त्यांना कठोरातली कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी शरद पवार यांनी केली आहे.

Koregaon Bhima Violence Has Done Out, Government Should Find This Outside - Sharad Pawar | कोरेगाव भीमा हिंसाचार बाहेरच्यांनी घडवला, या बाहेरच्यांना सरकारने शोधावे - शरद पवार 

कोरेगाव भीमा हिंसाचार बाहेरच्यांनी घडवला, या बाहेरच्यांना सरकारने शोधावे - शरद पवार 

googlenewsNext

सोलापूर - कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरण हे बाहेरच्या लोकांनी घडवले त्या बाहेरच्या लोकांना सरकारने शोधावे आणि त्यांना कठोरातली कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. अकलूज येथील रत्नाची महिला वसतिगृहाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. यावेळी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, खासदार विजयसिंह मोहिते पाटील इत्यादी नेते उपस्थित होते. 

(आणखी वाचा - कोरेगाव-भीमा घटना : देशाचे तुकडे झालेले सहन होणार नाही, उदयनराजे भोसलेंचा शरद पवारांना घरचा अहेर )

राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था आणि व्यथाही शरद पवारांनी त्यांच्या भाषणात मांडली. आम्ही पिकवणाऱ्यांचा विचार करतो आणि सरकार खाणाऱ्यांचा विचार करते आहे. सरकारने आता त्यांचे धोरण बदलण्याची गरज आहे. पिकवणारा जगला तर खाणारा जगेल ही गोष्ट सरकारने लक्षात घेतली पाहिजे असेही शरद पवारांनी म्हटले. 

कर्जमाफीमुळे पोटात दुखतं, मग बँकांना 80 हजार कोटी कसे दिले? 
सरकारकडे शेतकऱ्यांच्या सोसायटीचे पैसे भरायला पैसे नाहीत आणि बँकांच्या तूट भरायला पैसे कुठून आले?, असा प्रश्न उपस्थित करत, कोणाच्या कितीही पोटात दुखले तरी शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे, त्याच्या डोक्यावरचे ओझे उतरवून त्याला सन्मानाने जगण्याची संधी मिळाली पाहिजे, अशी ठाम भूमिका पवार यांनी घेतली. यानंतर पत्रकारांशी बोलताना पवार यांनी देशाच्या कृषी आणि आर्थिक धोरणावर सडकून टीका केली. देशाचा विकासदर घसरला असून, कृषी आणि औद्योगिक उत्पादनावर याचा विपरीत परिणाम झाला असल्याचे पवार यांनी सांगितले.

काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र,  सरकारला योग्य प्रत्युत्तर देऊ 
नागपूरमधील हिवाळी अधिवेशनानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले आहेत. ही समाधानाची बाब आहे. या सरकारच्या विरोधात काम करण्यासाठी दोन्ही पक्षांनी एकत्रितपणे काम केले पाहिजे. असे झाले तरच या सरकारला योग्य प्रत्युत्तर देऊ शकू असेही मत शरद पवारांनी यावेळी व्यक्त केले.  

Web Title: Koregaon Bhima Violence Has Done Out, Government Should Find This Outside - Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.