मंगळवेढयातील ग्रामपंचायती झाल्या कोटयाधीश

By admin | Published: May 22, 2016 12:20 PM2016-05-22T12:20:25+5:302016-05-22T12:20:25+5:30

मंगळवेढा तालुक्यातील ग्रामपंचायतींना गौणखनिज स्वामित्वधनाचा सन २0१३-१४ व २0१४-१५ या दोन वर्षाचा मिळून ७ कोटी ११ लाख २९ हजार ८२९ रुपये एवढा निधी मिळाला.

Kotayadpad becomes the Gram Panchayat of Mangalveer | मंगळवेढयातील ग्रामपंचायती झाल्या कोटयाधीश

मंगळवेढयातील ग्रामपंचायती झाल्या कोटयाधीश

Next
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत 
सोलापूर, दि. २२ -  मंगळवेढा तालुक्यातील ग्रामपंचायतींना गौणखनिज स्वामित्वधनाचा सन २0१३-१४ व २0१४-१५ या दोन वर्षाचा मिळून ७ कोटी ११ लाख २९ हजार ८२९ रुपये एवढा निधी मिळाला असून हा निधी गावाच्या विकासासाठी वापरण्यात येणार असल्याची माहिती गटविकास अधिकारी शेखर शेलार यांनी दिली.
 
मंगळवेढा तालुक्यातील ग्रामपंचतीना महसूलच्या गौण खनिज विभागाकडून हा निधी प्राप्त झाला असून सन २0१३-१४ या सालासाठीचा १ लाख २ हजार ५६0 रुपये तर सन २0१४-१५ या सालासाठी ७ कोटी १0 लाख २७ हजार २६९ रुपये असा मिळून मिळून ७ कोटी ११ लाख २९ हजार ८२९ रुपये एवढा निधी प्राप्त झाला आहे. तालुक्यातील सिद्धापूर आणि महमदाबाद (शे) या ग्रामपंचायतीना कोटीहून जास्त निधी मिळाल्याने या दोन ग्रामपंचायती कोट्यधीश झाल्या आहेत.
 
सिध्दापूर, महमदाबाद (शे) या गावातून गेल्या वर्षी वाळूचे लिलाव झाले होते. त्यामुळे या गावांना मोठय़ा प्रमाणावर गौण खनिज निधी प्राप्त झाला आहे.
 
सिद्धापूर - ५ कोटी ९७ लाख ८८ हजार ५८0 रुपये, महमदाबाद (शे) १ कोटी १ लाख ७३ हजार ९१७ रुपये, जुनोनी २ लाख ४३ हजार ८0५ रुपये, हुलजंती १ लाख २६ हजार ५९२ रुपये, येळगी २ लाख ५३ हजार १८५ रुपये, घरनिकी ५५ हजार ११३ रुपये, हिवरगाव ५१ हजार ५२ रुपये, मारापूर ४९ हजार ५२६ रुपये, पौट ४ हजार ५२८ रुपये, पडोळकरवाडी १ हजार ६८ रुपये, फटेवाडी ३ हजार ७५0 रुपये, निंबोनी २४ हजार ७९९ रुपये, ले. चिंचाळे १६ हजार ५0४ रुपये,
 
शिरशी २७ हजार ४१ रुपये, गोणोवाडी ३१ हजार ७६३ रुपये, बोराळे १८ हजार ७५९ रुपये, लमाणतांडा ३२ हजार ३0 रुपये, ब्रम्हपूरी ४९ हजार ४७९ रुपये, बठाण ३ हजार २७0 रुपये, माचणूर ७९ हजार १५३ रुपये, कचरेवाडी २९ हजार ५८ रुपये, भालेवाड़ी २२ हजार १३९ रुपये, पाटखळ ९ हजार २६७ रुपये, अरळी ३५ हजार २२४ रुपये, तांडोर १३८ रुपये सलगर ६५ रूपये या प्रमाणो ग्रामपंचायतच्या खात्यावर पंचायत समिती मधून निधी वर्ग करण्यात आला आहे. हा निधी ग्रामपंचायतने गावाच्या विकासासाठी खर्च करायचा असल्याचे गटविकास अधिकारी शेखर शेलार यांनी सांगितले.

Web Title: Kotayadpad becomes the Gram Panchayat of Mangalveer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.