कंदलगावात ग्रामस्थांनी उभारले कोविड केअर सेंटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:35 AM2021-05-05T04:35:52+5:302021-05-05T04:35:52+5:30
कोरोनाचा वाढता संसर्ग ग्रामस्थांच्या चिंतेचा विषय ठरला आहे. गेल्या काही दिवसांत परिसरामध्ये वाढत चाललेल्या रुग्णांची संख्या लक्षात घेऊन गावात ...
कोरोनाचा वाढता संसर्ग ग्रामस्थांच्या चिंतेचा विषय ठरला आहे. गेल्या काही दिवसांत परिसरामध्ये वाढत चाललेल्या रुग्णांची संख्या लक्षात घेऊन गावात कोविड केअर सेंटर उभारण्याची गरज असल्याचे मत नोकरदार मंडळीनी व्यक्त केले. सरपंच रावसाहेब पाटील यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. तातडीने बोलावलेल्या बैठकीत युवक आणि नोकरदारांनी रोख स्वरूपात रकमा दिल्या. यातून बेड, गाद्या, बेडशीट, औषधे, भोजन खरेदी करण्याचे ठरले. जिव्हाळा मतिमंद संस्थेच्या वतीने १० बेड देण्याची तयारी दर्शविली. येथील इंडियन पब्लिक स्कूलच्या इमारतीत ३० बेडचे कोविड केअर सेंटर सुरू करण्यास संस्थेचे अध्यक्ष प्रा. बिरप्पा शेजाळ यांनी अनुमती दर्शवली. स्थानिक ५ डॉक्टर कोविड सेंटरमध्ये मोफत सेवा देणार आहेत.
या बैठकीला कंदलगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी संगीता नलावडे, ग्रामविस्तार अधिकारी दयानंद पाटील, योगेश जोकारे, डॉ. मधुकर जोकारे, मलकारी कोरे, शिवानंद होनराव यांच्यासह युवक आणि नोकरदार उपस्थित होते.