भंडारकवठे येथे लोकसहभागातून ३० बेडचे कोविड सेंटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:17 AM2021-05-29T04:17:38+5:302021-05-29T04:17:38+5:30
भंडारकवठे येथील दानशूर आणि शासकीय सेवेतील ग्रामस्थांनी सढळ हाताने मदत करीत या कोविड सेंटरची उभारणी केली. मात्र, त्याचा शुभारंभ ...
भंडारकवठे येथील दानशूर आणि शासकीय सेवेतील ग्रामस्थांनी सढळ हाताने मदत करीत या कोविड सेंटरची उभारणी केली. मात्र, त्याचा शुभारंभ रखडला होता. जिल्हा परिषदेकडे वारंवार मागणी करूनही डॉक्टर आणि औषधे उपलब्ध होत नव्हती. बीडीओ राहुल देसाई यांच्या पाठपुराव्यामुळे मागणी पूर्ण झाली.
भंडारकवठे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी तसेच स्थानिक डॉक्टर या सेंटरमधील रुग्णांवर उपचार करणार आहेत. सरपंच चिदानंद कोटगोंडे यांनी याकामी पुढाकार घेतला. सोलापूर बाजार समितीचे संचालक वसंत पाटील, माजी पं. स. सदस्य विठ्ठल पाटील, उपसरपंच रवी तुरबे, शिवानंद हत्ताळे, मुत्तण्णा कारभारी, सिद्धाराम कुगणे, सोमनिंग बिराजदार, शरद पाटील, आमसिद्ध अजावडरे यांनी सहकार्य केले. प्रथमेश पाटील यांनी कोविड सेंटरसाठी परिश्रम घेतले.
------
प्रिसिजनकडून दोन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर
भंडारकवठे येथे ग्रामस्थांकडून कोविड केअर सेंटर उभारण्यात येत असल्याने सोलापूरच्या प्रिसिजन फाउंडेशनने याकामी मदत केली. फाउंडेशनने दोन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर कोविड सेंटरसाठी दिले. येथील प्रगतिशील शेतकरी आणि शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांनी ३० बेडचा खर्च उचलला.
----------
फोटो : २७ भंडारकवठे
ओळी - भंडारकवठे येथील कोविड केअर सेंटरचा शुभारंभ करताना मंद्रुपच्या अप्पर तहसीलदार उज्ज्वला सोरटे, नगरसेवक बाबा मिस्त्री, बाजार समितीचे संचालक वसंत पाटील, विठ्ठल पाटील, सरपंच चिदानंद कोटगोंडे आणि ग्रामस्थ.