माढा,कुर्डूवाडी अन्‌ टेंभूर्णी येथे सुरू होणार कोविड सेंटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:22 AM2021-04-07T04:22:51+5:302021-04-07T04:22:51+5:30

अधिक माहिती देताना आ. शिंदे म्हणाले की, माढा तालुका व माढा मतदारसंघातील कांही गावांमध्ये रूग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ...

Kovid Center to be started at Madha, Kurduwadi and Tembhurni | माढा,कुर्डूवाडी अन्‌ टेंभूर्णी येथे सुरू होणार कोविड सेंटर

माढा,कुर्डूवाडी अन्‌ टेंभूर्णी येथे सुरू होणार कोविड सेंटर

googlenewsNext

अधिक माहिती देताना आ. शिंदे म्हणाले की, माढा तालुका व माढा मतदारसंघातील कांही गावांमध्ये रूग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोना बाधित रूग्णांवर योग्यवेळी उपचार होण्यासाठी माढा, कुर्डूवाडी व टेंभूर्णी या ठिकाणी कोविड सेंटर सुरू करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली होती. त्यानुसार शासकीय वसतिगृह माढा, शासकीय वसतिगृह कुर्डूवाडी व संकेत मंगल कार्यालय, टेंभूर्णी येथे कोविड सेंटर सुरू करण्यास परवानगी मिळाली आहे. येत्या दोन दिवसात हे तिन्ही सेंटर होणार आहेत.

सध्या माढा तालुक्यातील रोपळे (क), मानेगांव, उपळाई बु, मोडनिंब,परिते, पिंपळनेर, टेंभूर्णी, आलेगांव बु. या सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत येणाऱ्या गावासह माढा ग्रामीण रूग्णालय, कुर्डूवाडी ग्रामीण रूग्णालय या ठिकाणी एकत्रित मिळून ५०० पेक्षा जास्त ॲक्टीव्ह रूग्ण आहेत. या रूग्णांवर कोविड सेंटरच्या माध्यमातून कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार करणे सुलभ होणार आहे.

मागील वर्षी देखील माढा, कुर्डूवाडी, टेंभूर्णी, महाळुंग व इतर ठिकाणी कोविड सेंटर सुरू करून बाधीत रूग्णांवर उपचार करण्यात आलेले आहेत, अशी माहीती आ. शिंदे यावेळी दिली.

नागरिकांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन आ. शिंदे यांनी केले आहे.

Web Title: Kovid Center to be started at Madha, Kurduwadi and Tembhurni

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.