जेऊर ग्रामीण रुग्णालयात कोविड सेंटर सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:21 AM2021-04-18T04:21:12+5:302021-04-18T04:21:12+5:30

जेव्हा कोरोनाची पहिली लाट मार्च २०२० मध्ये आली, त्याच वेळेस आपण सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जेऊर ग्रामीण रुग्णालयाची नवीन इमारत ...

Kovid Center will be started at Jeur Rural Hospital | जेऊर ग्रामीण रुग्णालयात कोविड सेंटर सुरू होणार

जेऊर ग्रामीण रुग्णालयात कोविड सेंटर सुरू होणार

Next

जेव्हा कोरोनाची पहिली लाट मार्च २०२० मध्ये आली, त्याच वेळेस आपण सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जेऊर ग्रामीण रुग्णालयाची नवीन इमारत उपजिल्हा रुग्णालयाच्या ताब्यात घेतली होती. २०१७ पासून या रुग्णालयाची इमारत धूळखात पडून होती. तेव्हा २० बेड सेंट्रल लाइन ऑक्सिजनचे तयार करून ठेवले होते. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे मनुष्यबळ भरती झाली नव्हती.

मनुष्यबळ भरतीसाठी पाठपुरावा सिव्हिल सर्जन व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडून विविध पदे मंजूर करून घेतली. आता पुढील आठवड्यात हे डेडिकेटेड कोविड सेंटर सुरू होईल.

या सेंटरसाठी गरज भासल्यास इतर आवश्यक सोयीसुविधा आपण आमदार निधीतून उपलब्ध करून देणार असल्याची माहितीही आ. संजयमामा शिंदे यांनी दिली. या कोविड सेंटरमध्ये सध्या २० ऑक्सिजन बेड व १० आयसोलेशन बेडची सुविधा रुग्णांसाठी उपलब्ध केली जाणार आहे.

Web Title: Kovid Center will be started at Jeur Rural Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.