पंढरपुरात निर्माण करणार अतिरिक्त १२० बेडचे कोविड हॉस्पिटल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:22 AM2021-04-11T04:22:15+5:302021-04-11T04:22:15+5:30

तालुक्यातील कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या सूचनेनुसार प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी पंढरपूर नगर परिषदेत शहरातील खाजगी ...

Kovid Hospital with additional 120 beds to be constructed at Pandharpur | पंढरपुरात निर्माण करणार अतिरिक्त १२० बेडचे कोविड हॉस्पिटल

पंढरपुरात निर्माण करणार अतिरिक्त १२० बेडचे कोविड हॉस्पिटल

googlenewsNext

तालुक्यातील कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या सूचनेनुसार प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी पंढरपूर नगर परिषदेत शहरातील खाजगी डॉक्टर व ऑक्सिजन पुरवठाधारक यांची बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, उपमुख्याधिकारी सुनील वाळूजकर, डॉ. बी. के. धोत्रे, डॉ. संभाजी भोसले, गणपती हॉस्पिटल डॉ. कारंडे, गॅलक्सी हॉस्पिटलचे डॉ. गुजरे, डॉ. सुरज पाचकवडे, ॲपेक्स हॉस्पिटलचे डॉ. आरिफ बोहरी, लाइफलाइनचे डॉ. संजय देशमुख उपस्थित होते.

यावेळी प्रांताधिकारी सचिन ढोले म्हणाले, रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवठा अखंडितपणे सुरू राहील. रुग्णालयांत वेळेत ऑक्सिजन प्राप्त होईल, याची दक्षता ऑक्सिजन पुरवठादाराने घ्यावी. यासाठी नियंत्रण अधिकाऱ्यांशी सतत संपर्कात राहावे. कोविड केअर सेंटर येथील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता वैद्यकीय सुविधेसाठी निमा संघटनेतील डॉक्टरांची मदत घेऊन होम आयसोलेशनची सुविधा निर्माण करावी. होम आयसोलेशनमध्ये असलेले नागरिक बाहेर फिरणार नाहीत, यांची दक्षता नगरपालिका प्रशासनाने घ्यावी. त्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व खाजगी व शासकीय वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर, प्रशासन यांनी एकात्मिक प्रयत्न करावेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

लॅबधारकांनी दरपत्रक दर्शनी भागात लावावे

लाइफलाइन हॉस्पिटलने पोलीस प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी यांच्या उपचारासाठी तत्काळ डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल कार्यान्वित करावे. शहरातील लॅबधारकांनी रॅपिड ॲन्टिजन व आरटीपीसार तपासणीचे दर शासनाच्या ठरवून दिलेल्या नियमानुसार घ्यावेत. त्याबाबत दरपत्रक दर्शनी भागावर लावावे. डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलचे फायर ऑडिट व इलेक्ट्रिसिटी ऑडिट संबंधित रुग्णालयांनी करून घ्यावे. याबाबत रुग्णालयांची तपासणी नगरपालिका प्रशासनाने करून घ्यावी, अशा सूचनाही प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिल्या.

Web Title: Kovid Hospital with additional 120 beds to be constructed at Pandharpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.