माळशिरस तालुक्यात कोविड रूग्णालय सुरू करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:23 AM2021-05-06T04:23:04+5:302021-05-06T04:23:04+5:30
अकलूज : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र गंभीर परिस्थिती आहे. ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी प्राथमिक अवस्थेत कोरोना रुग्णांवर उपचार होणे गरजेचे ...
अकलूज : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र गंभीर परिस्थिती आहे. ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी प्राथमिक अवस्थेत कोरोना रुग्णांवर उपचार होणे गरजेचे आहे. माळशिरस तालुक्यात शासकीय डेडिकेटेड कोविड रुग्णालय व गावागावात कम्युनिटी कोविड केअर सेंटर सुरु करावे, अशी मागणी भाजपचे जिल्हा संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते-पाटील यांनी केली आहे.
अकलूजमधील काही खासगी रूग्णालयांत कोरोनावर उपचार होतात. मात्र, सर्वसामान्य व गोरगरिबांना हा खर्च परवडणारा नाही. अकलूज येथील पर्यटन विकास महामंडळाची इमारत किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र, महाळुंग येथील नवीन इमारतीमध्ये १०० बेडचे शासकीय डीसीएच रुग्णालय सुरु करावे, कोरोनाची सौम्य लक्षणे असणाऱ्या रूग्णांना स्थानिक पातळीवर तत्काळ प्राथमिक उपचार मिळत नाहीत. हे टाळण्यासाठी तालुक्यातील प्रत्येक गावात कम्युनिटी कोविड केअर सेंटर सुरू करावे, अशी मागणी मोहिते-पाटील यांनी केली आहे.