टेंभुर्णीत २०० जणांना दिली कोविड लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:21 AM2021-02-14T04:21:44+5:302021-02-14T04:21:44+5:30
सरपंच प्रमोद कुटे व सहा. पोलीस निरीक्षक अमित शितोळे यांच्या हस्ते प्रतिमा पूजनाने या उपक्रमाची सुरुवात केली. यावेळी तालुका ...
सरपंच प्रमोद कुटे व सहा. पोलीस निरीक्षक अमित शितोळे यांच्या हस्ते प्रतिमा पूजनाने या उपक्रमाची सुरुवात केली. यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवाजी थोरात, वैभव कुटे, उपसरपंच धनंजय गोंदिल, वैद्यकीय अधिकारी नंदकुमार घोळवे, डॉ. विक्रांत रेळेकर, डॉ. नितीन देशपांडे, डॉ. यशवंत सातपुते, रामभाऊ शिंदे, गणेश केचे, शैलेश ओहोळ, नारायण गायकवाड, डॉ. प्रणिता खोटे यांच्यासह आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी डॉ.नंदकुमार घोळवे यांनी मी स्वतः लसीकरण करून घेतले असून लस सुरक्षित असल्याचे सांगितले. डॉ. विक्रांत रेळेकर यांनी कोणताही आजार असला तरी ही लस घ्यायला हवी, ती सुरक्षित आहे असे सांगितले. सरपंच प्रमोद कुटे यांनी आभार मानले. या लसीकरणासाठी आरोग्य केंद्रातील डॉक्टर, कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
फोटो
१३टेंभुर्णी-लसीकरण
ओळी
टेंभुर्णी येथे कोविडची लसीकरण करून घेताना सहायक पोलीस निरीक्षक अमित शितोळे.