१.७१ लाखांची फसवणुक करणाऱ्या सोलापूरच्या कुमार करजगीला दोन दिवसाची पोलीस कोठडी
By admin | Published: March 24, 2017 02:47 PM2017-03-24T14:47:08+5:302017-03-24T14:47:08+5:30
१.७१ लाखांची फसवणुक करणाऱ्या सोलापूरच्या कुमार करजगीला दोन दिवसाची पोलीस कोठडी
१.७१ लाखांची फसवणुक करणाऱ्या सोलापूरच्या कुमार करजगीला दोन दिवसाची पोलीस कोठडी
सोलापूर: जुनी मिल जागेच्या फसवणूक प्रकरणात उद्योजक कुमार करजगी यांना अटक केल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांची शासकीय रुग्णालयात रात्री साडेनऊच्या सुमारास वैद्यकीय तपासणी करण्यात आली. करजगी यांनी विश्वासघात करुन १ लाख ७१ हजार ७५० रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार आहे. शुक्रवारी जिल्हा न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली़
जुनी मिल कापड गिरणी आशिया खंडातील सोलापूरस्थित सर्वात मोठी कापड गिरणी होती. हजारो कामगार या गिरणीत काम करीत होते. न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे कोर्ट रिसिव्हरने जुनी मिलचे साहित्य विक्रीला काढून देणेकऱ्यांचे काही देणे दिले. उर्वरित देणी देण्यासाठी मिलकडे फक्त मोकळी जमीन राहिल्याने कोर्ट रिसिव्हरने १९८८ साली सर्व जमीन सहा लॉटमध्ये लिलावाद्वारे विक्री करण्याचा निर्णय घेतला. त्यात जुनी मिल कंपाऊंड (६५ एकर), मोतीबाग आवार, सिव्हिल लाईन्स (१५ एकर), हिरज रोडवरील शेतजमीन (३७ एकर), रेल्वे लाईनजवळील शेतजमीन (१५ एकर), धरमसी लाईन (३ एकर) आणि जुनी पोलीस लाईन चाळ या जागांचा समावेश आहे.
कुमार करजगी यांनी जुनी मिल बेकार कामगार व अर्जदार आणि जनहित संघर्ष समिती या नावाने संस्था स्थापन केली. तेथील जागा २० रुपये प्रतिचौरस फुटास २० हजार रुपये याप्रमाणे युनो बँकेत संस्थेच्या खात्यावर २ कोटी ५३ लाख ७७ हजार रुपये भरले. या जागेच्या संदर्भात उच्च न्यायालयातील बोली मान्य झाल्यानंतर लिलावात रक्कम वाढल्याचे सांगून प्रत्येक सभासदाकडून जादा १० हजार रुपये संघर्ष समितीच्या खात्यावर जमा करण्यास सांगितले. या दरम्यान कुमार करजगी यांनी स्वत:च्या मुलाच्या नावावर के. के. असोसिएटस् नावाची संस्था स्थापन करून या संस्थेद्वारे जुनी मिल परिसराचा विकास व सभासदांना घरे बांधून घेण्यासाठी सक्ती केली. पुन्हा सभासदांकडून २५ हजार रुपये प्रति प्लॉटप्रमाणे घेतले. त्यानंतर आजतागायत करजगी यांच्याकडून जागेचा प्रत्यक्ष ताबा मिळाला नाही. आम्हा सभासदांचा विश्वासघात करुन १,७१,७५० रुपयांची फसवणूक केली, अशा आशयाची तक्रार अजितकुमार देशपांडे यांनी पोलिसांकडे केली आहे.