कुर्डूवाडी पालिकेचे मुख्याधिकारी दीर्घ रजेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:16 AM2021-06-26T04:16:55+5:302021-06-26T04:16:55+5:30
कुर्डूवाडी नगर पालिका गेल्या काही दिवसांपासून कोणत्या ना कोणत्या विषयावरून चर्चेत आहे. बोगस काम दाखवून शासकीय निधीचा गैरवापर केला ...
कुर्डूवाडी नगर पालिका गेल्या काही दिवसांपासून कोणत्या ना कोणत्या विषयावरून चर्चेत आहे. बोगस काम दाखवून शासकीय निधीचा गैरवापर केला असल्याचा आरोप करीत येथील राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दत्ताजी गवळी, आरपीआयचे जिल्हा उपाध्यक्ष अमर माने, युवा सेनेचे तालुका समन्वयक अतुल फरतडे यांच्यासह येथील सर्वपक्षीय नेत्यांनी नगर पालिका प्रशासनाविरोधात मागील आठवड्यात दोन दिवस येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले होते. त्याबरोबरच शहरात अंतर्गत गटारींच्या अर्धवट विविध कामांमुळे पावसात नागरिकांना होणारा नाहक त्रास, रखडलेले बालोद्यानचे काम, पुतळ्यांच्या सुशोभिकरण कामास विलंब व गेल्या दोन दिवसांपासून शहरातील विस्कळीत झालेला पाण्याचा पुरवठा यांसारख्या प्रश्नांवरून चर्चेत आहे.
----
मुख्याधिकारी ३ जूनपासून रजेवर आहेत. त्यामुळे येथील नगर पालिकेच्या मुख्याधिकारी पदाचा चार्ज करमाळ्याच्या मुख्याधिकाऱ्याकडे दिला आहे. येथील अत्यावश्यक सेवा सुरळीत सुरू आहेत.
- अतुल शिंदे,कार्यालयीन अधीक्षक, नगरपालिका, कुर्डूवाडी
----