कुर्डूवाडीचे पोलीस निरीक्षक गायकवाड यांचा नियंत्रण कक्षात बदली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:18 AM2021-06-04T04:18:10+5:302021-06-04T04:18:10+5:30

कुर्डूवाडी : येथील पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक रवींद्र डोंगरे यांची दीड महिन्यापूर्वी पंढरपूर येथे मंदिर पोलीस स्टेशनला बदली ...

Kurduwadi police inspector Gaikwad transferred to control room | कुर्डूवाडीचे पोलीस निरीक्षक गायकवाड यांचा नियंत्रण कक्षात बदली

कुर्डूवाडीचे पोलीस निरीक्षक गायकवाड यांचा नियंत्रण कक्षात बदली

Next

कुर्डूवाडी : येथील पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक रवींद्र डोंगरे यांची दीड महिन्यापूर्वी पंढरपूर येथे मंदिर पोलीस स्टेशनला बदली झाली होती. त्यांच्या जागी पंढरपूर येथील पोलीस निरीक्षक गोरख गायकवाड यांची नियुक्ती झाली होती. मात्र दीड महिन्यातच पोलीस अधीक्षकांनी गोरख गायकवाड यांची नियंत्रण कक्षाला तातडीने बदली केली. आता गायकवाड यांच्या जागी याच पोलीस ठाण्याचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक चिमणाजी केंद्रे यांच्याकडे प्रभारी म्हणून पदभार दिला आहे.

कुर्डूवाडी पोलीस ठाण्यातून दीड महिन्यात पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दोन पोलीस निरीक्षकांची उचलबांगडी केली आहे. अचानक असे काय घडले की नव्या अधिकाऱ्यांना कुर्डूवाडी समजायच्या आतच त्यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली.

पोलीस अधीक्षक सातपुते यांनी मागील आठवड्यात कुर्डूवाडी पोलीस ठाण्याला भेट दिली होती. कोरोना काळात विनाकारण फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणे, त्यांची वाहने जप्त करणे, मास्क न घातलेल्यांवर दंडात्मक कारवाई करणे याबाबत सूचना दिल्या होत्या. तरीही अनेक जण मोकाट फिरताना आढळून आले.

.........

गोपनीय तक्रारी

कुर्डूवाडी शहरासह अनेक गावांतून अवैध धंदे कोरोनाच्या काळातही सुरू आहेत. त्याचबरोबर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्देशांचे पालन होत नसल्याने बाधित रुग्ण वाढत गेले. याबाबत पोलीस अधीक्षकांकडे काही नागरिकांनी गोपनीय तक्रारी केल्या होत्या. आता सहायक पोलीस निरीक्षक चिमणाजी केंद्रे यांच्याकडे पदभार दिला आहे.

Web Title: Kurduwadi police inspector Gaikwad transferred to control room

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.