कुर्मदास साखर कारखाना पहिला हप्ता देणार १९०० रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 04:18 AM2020-12-09T04:18:11+5:302020-12-09T04:18:11+5:30
माढा : संत कुर्मदास सहकारी साखर कारखान्यात या हंगामात ६ डिसेंबरपर्यंत ५१,२८० टन गाळप करण्यात आले आहे. ...
माढा : संत कुर्मदास सहकारी साखर कारखान्यात या हंगामात ६ डिसेंबरपर्यंत ५१,२८० टन गाळप करण्यात आले आहे. सध्या ७.६७ टक्के रिकव्हरीने गाळप हंगाम सुरू आहे. यंदा पहिला हप्ता १९०० रुपये जाहीर करण्यात आल्याची माहिती चेअरमन माजी आमदार धनाजी साठे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शासनाचा एफआरपी २०६७. ६३ रुपये असून, या शासकीय दराप्रमाणे ८८ टक्के हप्ता देण्यात येणार आहे. सध्या १२५० ते १३५० टन ऊस प्रतिदिन गाळप सुरू आहे. यावर्षी सभासदांना दिवाळीसाठी ३० रुपये दराने साखर वाटप करण्यात आली. यावर्षी अडीच लाख टन गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मात्र शासनाच्या वतीने कारखान्यांना पाच कोटी १५ लाखांची मदत मंजूर केली होती. ही मदतदेखील कारखान्याला मिळाली नसल्याची माहिती साठे यांनी दिली.
या पत्रकार परिषदेस काँग्रेस नेते दादासाहेब साठे, अमोल चव्हाण, वेदांत साठे, हनुमंत राऊत, नितीन साठे उपस्थित होते.