कुरनूर धरणातून रब्बीसाठी पुढील आठवड्यात पाणी सोडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:24 AM2021-02-11T04:24:05+5:302021-02-11T04:24:05+5:30

या बैठकीला पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी प्रकाश बाबा, नगरपालिकेचे पक्षनेते महेश हिंडोळे, भाजपचे तालुकाध्यक्ष मोतीराम राठोड, व्यंकट मोरे यांच्यासह ...

The Kurnoor dam will release water for the rabbi next week | कुरनूर धरणातून रब्बीसाठी पुढील आठवड्यात पाणी सोडणार

कुरनूर धरणातून रब्बीसाठी पुढील आठवड्यात पाणी सोडणार

Next

या बैठकीला पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी प्रकाश बाबा, नगरपालिकेचे पक्षनेते महेश हिंडोळे, भाजपचे तालुकाध्यक्ष मोतीराम राठोड, व्यंकट मोरे यांच्यासह इतर अधिकारी, सल्लागार समितीचे सदस्य व नदीकाठचे शेतकरी उपस्थित होते.

या बैठकीत संपूर्ण उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यावर्षी अतिपावसामुळे कुरनूर धरण भरले होते. आजअखेर धरणामध्ये ९३ टक्के पाणीसाठा आहे. या पार्श्वभूमीवर पुढील आठवड्यात धरणातून रब्बी पिकासाठी पाणी सोडण्यात येईल. त्या माध्यमातून धरणाखाली असणारे आठही कोल्हापूर पद्धतीचे बंधारे भरून घेतले जाणार आहेत. धरणातून २० ते २२ टक्के पाणी खाली सोडण्यात येणार आहे. दरवर्षी फेब्रुवारी किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात पाण्याचे नियोजन करण्यात येत असते.

तिन्ही नगरपालिकांतील पाण्याचा विचार करून नियोजन

दुधनी, मैंदर्गी, अक्कलकोट या तिन्ही नगरपालिकांच्या पिण्याच्या पाण्याचा विचार करून यासंदर्भात नियोजन केले गेले आहे. यावर्षी पाणी अजूनही नव्वद टक्क्यांच्या पुढे आहे. त्यामुळे यंदाचा उन्हाळा तालुक्याच्या दृष्टीने चांगला राहील. गेल्यावर्षी अनेक बंधाऱ्यातून प्रचंड पाण्याची गळती होत होती. त्याची दुरुस्ती काही प्रमाणात झालेली आहे. त्यामुळे पाणी वाया जाण्याची शक्यता कमी आहे. या निर्णयामुळे मिरजगी, सातनदुधनी, संगोगी, रुद्देवाडी, बबलाद, सांगवी, बणजगोळ, सिंदखेड हे सर्व बंधारे भरून घेतले जाणार आहेत. त्याचा फायदा हा नदीकाठच्या गावांना व रब्बी पिकांना होणार आहे, असे सांगण्यात आले.

फोटो

१०अक्कलकोट-बैठक

ओळी

अक्कलकोट येथे आयोजित कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत बोलताना आमदार सचिन कल्याणशेट्टी व अधिकारी.

Web Title: The Kurnoor dam will release water for the rabbi next week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.