शिष्यवृत्तीत कुरुल हायस्कूल अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:27 AM2021-08-25T04:27:54+5:302021-08-25T04:27:54+5:30
कुरुल : राष्ट्रीय दुर्बल आर्थिक घटक शिष्यवृत्ती परीक्षेत कुरूल येथील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत ...
कुरुल : राष्ट्रीय दुर्बल आर्थिक घटक शिष्यवृत्ती परीक्षेत कुरूल येथील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून विद्यार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आली. या परीक्षेत तीन विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत. वैष्णवी संभाजी धर्मशाळे, कर्तव्या राजकुमार बाळसराफ, विक्रांत राजेंद्र शिंदे या तीन विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. या विद्यार्थ्यांना विभागप्रमुख व्ही. ए. गायकवाड, एस. एम. माने, ए. ए. बिराजदार, जी. एस. आतकरे, एस. एस. अक्कलकोटे, पी. ए. सुर्वे यांनी मार्गदर्शन केले. प्राचार्य राजेंद्र रेपाळ, पर्यवेक्षक डी. टी. मोहिते, रयत शिक्षण संस्थेच्या मध्य विभागाचे चेअरमन संजीव पाटील, विभागीय अधिकारी कमलाकर महामुनी, स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य विलास पाटील, तंटामुक्त समिती अध्यक्ष शत्रुघ्न जाधव, लिसुराम उद्योग समुहाचे संस्थापक अध्यक्ष लिंगेश्वर निकम, शिवसेना तालुका उपाध्यक्ष विनोद आंबरे, दत्तात्रय बोंगे, महेश माने, संजीव अक्कलकोटे, राजीव अक्कलकोटे, नीलकंट खरात, के. एस. बिराजदार, विनोद खाडे यांनी कौतुक केले.
------
फोटो :
२४ वैष्णवी धर्मशाळे,
२४ कर्तव्या बाळसराफ