कुसळंबचे विद्यार्थी एनएमएमएसमध्ये अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:26 AM2021-08-28T04:26:05+5:302021-08-28T04:26:05+5:30
कुसळंब : राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक परीक्षा एनएमएमएस शैक्षणिक वर्षाची निवड यादी जाहीर झाली आहे. या परीक्षेत कुसळंबच्या दोन ...
कुसळंब : राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक परीक्षा एनएमएमएस शैक्षणिक वर्षाची निवड यादी जाहीर झाली आहे. या परीक्षेत कुसळंबच्या दोन विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. कुसळंब ग्रामपंचायतीच्या वतीने इंदिरा सार्वजनिक वाचनालय येथे सत्कार करण्यात आला.
मयूर विनोद पवार (युजेएनटी) याने जिल्ह्यात दुसरा क्रमांक तर श्रेया संजय बोकेफोडे एससी प्रवर्गातून जिल्ह्यात अकरावी आली आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच शिवाजी खोडवे, विनोद गादेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी विनोद गादेकर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, मुलांना सनदी अधिकारी बनवायचा असेल तर त्याला जिल्हा परिषद शाळेतून शिक्षण द्या. त्याच्याकडे स्वतःही लक्ष द्या, तरच त्याचा विकास व गावाचा विकास आणि घराचा विकास होऊ शकेल. यावेळी सरपंच शिवाजी खोडवे, उपसरपंच किशोर काशीद, ग्रामसेवक शिवकुमार पायघन, तलाठी किशोर कुमार राठोड, रोहित शिंदे, विश्वास काशीद, सतीश पोटरे, विजयकुमार शिंदे, विनोद पवार, धनाजी काशीद, अशोक झोंबाडे, संतोष चौधरी, गणेश चौधरी, सूर्यकांत काशीद, सागर गादेकर, नीलेश चौधरी, दादा काळे, गणेश काळे, प्रीतेश बोकेफोडे, प्रदीप काशीद, नाना काशीद, सुजीत शिंदे, दादा लोंढे, हनुमंत पवार उपस्थित होते.
-------
फोटो : २७ कुसळंब
एनएमएमएसमध्ये अव्वल ठरलेल्या कुसळंब येथील विद्यार्थ्यांच्या सोहळ्याप्रसंगी विनोद गादेकर, संजय बोकेफोडे, शिवकुमार पायघन, किशोरकुमार राठोड, सतीश पोटरे.