बनावट कोरोना रिपोर्ट तयार करणारी पंढरपुरातील लॅब सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:23 AM2021-04-09T04:23:52+5:302021-04-09T04:23:52+5:30

कोविड तालुका कृती समिती मार्फत पंढरपूर शहरातील अनधिकृत कोविड टेस्टिंग करुन बनावट रिपोर्ट वात्सल्य पॅथॉलॉजी लॅब देत होती. ...

Lab seal in Pandharpur making fake corona report | बनावट कोरोना रिपोर्ट तयार करणारी पंढरपुरातील लॅब सील

बनावट कोरोना रिपोर्ट तयार करणारी पंढरपुरातील लॅब सील

Next

कोविड तालुका कृती समिती मार्फत पंढरपूर शहरातील अनधिकृत कोविड टेस्टिंग करुन बनावट रिपोर्ट वात्सल्य पॅथॉलॉजी लॅब देत होती. याची माहिती मिळताच उपजिल्हा रुग्णालय, वैद्यकीय अधीक्षक डॉ. गिराम, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, नायब तहसीलदार कोळी, पोलीस उपनिरीक्षक मगदूम यांच्या पथकाने अचानक धाड टाकली. यावेळी वात्सल्य लॅब चालक आदमिले यास अवैध रिपोर्ट तयार करताना आणि रॅपिड अँटिजेन टेस्ट किट सहित रंगेहाथ पकडले. त्याला किट पुरवणारा तसेच बनावट अहवाल तयार करुन देणारा उमेश शिंगटे यालाही ताब्यात घेतले.

आदमिले व शिंगटे या दोघांनी हे काम गेल्या २-३ महिन्यांपासून करत असल्याची कबुली दिली. याबाबत शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात अजून किती जण आहेत, याची चौकशी चालू आहे.

अशा प्रकारची कोणतीही अनधिकृत कोविड टेस्टिंग आपल्या रुग्णालय अथवा लॅबमध्ये केली जात नाही. याची पंढरपूर शहर व तालुक्यातील सर्व डॉक्टर्स आणि पॅथॉलॉजी लॅब चालकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ. गिराम यानी केले आहे. जर असे काही आढळून आल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असा इशाराही दिला आहे.

Web Title: Lab seal in Pandharpur making fake corona report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.