बार्शीत ऑक्सिजन, रेमडेसिविरचा तुटवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:24 AM2021-04-23T04:24:23+5:302021-04-23T04:24:23+5:30
आमदार राऊत यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासमोर संपूर्ण बार्शी तालुक्यातील कोरोना प्रादुर्भाव परिस्थितीचा आढावा दिला. त्याचप्रमाणे कोरोना रुग्णांवर उपचार करत ...
आमदार राऊत यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासमोर संपूर्ण बार्शी तालुक्यातील कोरोना प्रादुर्भाव परिस्थितीचा आढावा दिला. त्याचप्रमाणे कोरोना रुग्णांवर उपचार करत असताना ऑक्सिजन, रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा याबाबतच्या अडचणी मांडल्या तसेच आसपासच्या ८ ते १० तालुक्यांतील कोरोना रुग्णांचाही उपचार बार्शी तालुक्यातच होत असल्यामुळे येथील आरोग्य यंत्रणेवर ताण पडत आहे. रुग्णांवर उपचार करण्याकरिता केवळ बार्शी तालुका मर्यादित धरूनच ऑक्सिजन व इंजेक्शनचा पुरवठा होत असल्याची माहिती त्यांनी मा. मुख्यमंत्री महोदयांना दिली.
कोरोना रुग्णांवर वैद्यकीय उपचार देताना येत असलेला ताण कमी करण्यासाठी इतर ८ ते १० तालुक्यांतून येणाऱ्या रुग्णांच्याही वाट्याचा ऑक्सिजन व इंजेक्शनचा पुरवठा येथे मिळावा, अशी आग्रही मागणी त्यांनी मा. मुख्यमंत्री यांच्याकडे केली.
तसेच आमदार राऊत यांनी गुरुवारी पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याशीही फोनवरून संपर्क करून बार्शी तालुक्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा सांगितला तसेच येणाऱ्या अडी-अडचणी सोडविण्यासाठी मदत करण्याची मागणी केली.
बार्शीसाीठी ‘विशेष मदत’ची मागणी
आमदार राजेंद्र राऊत यांनी रात्री उशिरा आरोग्यमंत्री राजेश टोपे, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याशी बार्शी तालुक्यातील कोरोना प्रादुर्भावाचा परिस्थितीबाबत मोबाईलवरून चर्चा केली. यासह अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून बार्शीला विशेष मदत करण्याची मागणी केली.