पोलीस कोविड सेंटरला लाखाची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:20 AM2021-05-01T04:20:47+5:302021-05-01T04:20:47+5:30
सध्या सर्वत्र कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. अशा परिस्थितीत ही पोलीस बांधव आपले कर्तव्य बजावत आहेत. यातूनही काही पोलीस ...
सध्या सर्वत्र कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. अशा परिस्थितीत ही पोलीस बांधव आपले कर्तव्य बजावत आहेत. यातूनही काही पोलीस बाधित झाल्यानंतर त्यांच्या उपचारासाठी पंढरपूर येथे कोविड केअर सेंटर सुरू केले असून त्यास विठ्ठलराव शिंदे कारखान्यातर्फे एक लाख रुपयांची मदत जाहीर केल्याची माहिती चेअरमन आ. बबनराव शिंदे यांनी दिली.
पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पोलीस कोविड केअर सेंटरला मदत करण्याचे आवाहन केले होते, त्यास प्रतिसाद देत विठ्ठलराव शिंदे कारखान्यामार्फत १ लाख रुपयाचा धनादेश कारखान्याचे संचालक रणजितसिंह शिंदे यांनी टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. याप्रसंगी कारखान्याचे डे. चिफ अकाउंटट डी. टी. देसाई, सुरक्षा अधिकारी एफ. एम. दुंगे, अकाउंटंट एन. के. लाटणे उपस्थित होते.