लाखो शिवसैनिक कनिमी काव्याने शिवाजी पार्कवर शिरणार; सोलापुरातील युवा सेनेची रणनिती ठरली

By Appasaheb.patil | Published: September 21, 2022 04:55 PM2022-09-21T16:55:44+5:302022-09-21T16:55:51+5:30

कायदेशीरपणे शिवसेनेच्या मेळाव्याला परवानगी द्या ः राज्य विस्तारक शरद कोळींचा इशारा

Lakhs of Shiv Sainiks will enter Shivaji Park with Kanimi Kavya; The strategy of the youth army in Solapur was decided | लाखो शिवसैनिक कनिमी काव्याने शिवाजी पार्कवर शिरणार; सोलापुरातील युवा सेनेची रणनिती ठरली

लाखो शिवसैनिक कनिमी काव्याने शिवाजी पार्कवर शिरणार; सोलापुरातील युवा सेनेची रणनिती ठरली

Next

सोलापूर : येत्या दसरा मेळाव्याला शासनाने शिवसेनेला परवानगी दिलेली नाही त्यामुळे हे प्रकरण आता न्यायालयात गेले असताना सोलापूर जिल्ह्यात मात्र शिवसैनिक आता चांगलेच अक्रमक झाले आहेत. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची परंपरा खंडित करण्याचा डाव राज्यशासनाने आखला आहे. मात्र हा डाव युवा सैनिक कोणत्याही परिस्थितीत उधळून लावतील, त्यामुळे शिवाजी पार्कवर शिवसेनेच्या मेळाव्याला राज्यशासनाने गप्प गुमानपणे परवानगी द्यावी अन्यथा राज्यभरातून लाखो शिवसैनिक घेवून शिवाजी पार्कवर खुसु असा इशारा युवा सेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी यांनी दिला आहे.

मुंबईत दसरा मेळाव्याची जय्यत तयारी शिवसेनेच्या वतीने सुरु झाली असतानाच दुसरीकडे शासनाने शिवाजी पार्कवरील मेळाव्याला अद्याप परवानगी दिलेली नाही. त्यामुळे शिवसेनेने कायदेशीरपणे परवानगी मागितली आहे. त्यामुळे शासनाने या गोष्टीत राजकारण न करता शिवसेनेची परपंरा कायम ठेवण्यासाठी रितसर परवानगी द्यावी अशी मागणी कोळी यांनी केली आहे. जर शिवसेनेच्या मेळाव्याला जाणिवपूर्वक अडचण करण्याचा प्रयत्न केला तर राज्यभरातून तसेच विविध जिल्ह्यातील लाखो युवा सैनिक घेवून शिवाजी पार्कवर घुसु त्यानंतर होणार्‍या परिणामाला सर्वस्वी राज्यशासन जबाबदार राहिल असा इशारा ही कोळी यांनी दिला आहे. त्यामुळे दसरा मेळाव्याची तयारी कनिमी कावा पध्दतीने करु असा इशरा सोलापूर जिल्ह्यातील शिवसैनिकांनी राज्यशासनाला दिला आहे.

Web Title: Lakhs of Shiv Sainiks will enter Shivaji Park with Kanimi Kavya; The strategy of the youth army in Solapur was decided

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.