लालपरीला मिळाला नाही डिझेलचा खुराक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:28 AM2021-02-17T04:28:13+5:302021-02-17T04:28:13+5:30
शासनाकडून वेळेत डिझेल पुरविले जाते मात्र मंगळवारी मिळाले नाही. यामुळे सकाळपासून लांब पल्याच्या तुरळक गाड्या सुटल्या. बाकीच्या डिझेलच्या प्रतीक्षेत ...
शासनाकडून वेळेत डिझेल पुरविले जाते मात्र मंगळवारी मिळाले नाही. यामुळे सकाळपासून लांब पल्याच्या तुरळक गाड्या सुटल्या. बाकीच्या डिझेलच्या प्रतीक्षेत निम्मा दिवस थांबून राहिल्या. अक्कलकोट डेपोमधून पुण्याला दर तासाला एक गाडी सुटते मात्र मंगळवारी वाहतूक व्यवस्था कोलमडली. सोलापूर, नाशिक, नांदेड, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, सांगली, सातारा, इचलकरंजगी, रत्नागिरी, बीड, मालवण आदी भागांतून स्वामी भक्त एस. टी. बसने प्रवास करून येत असतात. अक्कलकोट येथे आले की, श्रीक्षेत्र गाणगापूर, पंढरपूर, तुळजापूर, आशा आदी तीर्थक्षेत्राचे दर्शन घेऊन भक्त परतीचा प्रवास करीत असतात. यासाठी त्यांचे वेळेचे नियोजन झालेले असते. ते मंगळवारी पूर्णपणे कोलमडले. यामुळे प्रवाशांची धांदल उडाली.
----
डिझेलअभावी मंगळवारी अक्कलकोट आगारात शेकडो बसगाड्या थांबून राहिल्या. यामुळे चालक, वाहक डेपोत टाइमपास करीत बसावे लागले. दुसरीकडे बसस्थानकावर प्रवाशांना कोणतीच सूचना नसल्याने त्यांना गोंधळ उडाला. वेळोवेळी नुसती चौकशी करीत फिरावे लागले. पूर्वसूचना नसताना अचानकपणे बस बंद झाल्याने मुंबई, पुणे यांसारखे लांबपल्ल्याच्या स्वामी भक्तांना गैरसोयीना तोंड द्यावे लागले.
---
सकाळी अडजेस्टमेंट काही ठिकाणच्या बसेस सोडण्यात आल्या. मात्र सकाळी ११ वाजल्यापासून डिझेलची अडचण निर्माण झाली. यामुळे प्रवाशांना गैरसोय सहन करावी लागली. दुपारी अडीच वाजता बाळे येथून डिझेल टँकर आल्याने बससेवा पूर्ववत करण्यात आली.
- रमेश म्हंता, आगार प्रमुख अक्कलकोट
----
१६अक्कलकोट-एसटी१/ १६ अक्कलकोट एसटी२
अक्कलकोट आगारामध्ये डिझेलअभावी जागेवरच उभ्या असलेल्या एस. टी. बस
- बसेस जागेवर असल्यामुळे आगारामध्ये थांबून राहिलेले चालक-वाहक.