लांबोटी - सीना सेतू रस्ता उखडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:19 AM2020-12-23T04:19:14+5:302020-12-23T04:19:14+5:30
अर्जुनसोडं-लांबोटी रस्ता डांबरीकरणाची मागणी लांबोटी : अर्जुनसोंड-लांबोटी रस्ता खराब झाला आहे. हा रस्ता लांबोटी स्टँडवरून अर्जुनसोंडला जाण्यासाठी महत्त्वाचा आहे. ...
अर्जुनसोडं-लांबोटी रस्ता डांबरीकरणाची मागणी
लांबोटी : अर्जुनसोंड-लांबोटी रस्ता खराब झाला आहे. हा रस्ता लांबोटी स्टँडवरून अर्जुनसोंडला जाण्यासाठी महत्त्वाचा आहे. या मार्गावरून सध्या उसाची वाहतूक होत आहे. हा रस्ता डांबरीकरण करण्याची मागणी सर्वसामान्यांतून होत आहे
सावळेश्वरमध्ये वाढली काटेरी झाडे
लांबोटी : सावळेश्वर ( ता. मोहोळ ) येथील राष्ट्रीय महामार्ग ते गावा दरम्यान रस्त्यालगत काटेरी झाडे वाढली आहेत. या झाडामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. ही काटेरी झाडे काढण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
डिकसळ पुलावरील संरक्षक पाइप गायब
वाळूज : डिकसळ ( ता. मोहोळ ) येथील भोगावती नदीवरील पुलाचे संरक्षक पाइप आक्टोबरमध्ये अतिवृष्टीत वाहून गेले आहेत. यामुळे भोगावती नदीला पूर आला होता. या पाण्यात संरक्षक पाइप आणि सिमेंट कठडे वाहून गेले आहेत. या पुलावरून वाहनांची वर्दळ सतत आहे. प्रसंगी पुलावरून एखादी दुर्घटना होऊ शकते. संरक्षक पाइप बसविण्याची मागणी शेतकरी आणि वाहनधारकामधून होत आहे.
वाळूज - धानोरे रस्ता झाला ओबड-धोबड
वाळूज : मोहोळ तालुक्यातील वाळूज-धानोरे रस्ता बऱ्याच दिवसांपासून ओबड-धोबड झाला आहे. वाहनधारकांना कसरत करावी लागते. हा रस्ता मोहोळ आणि माढा तालुक्याला जोडणारा रस्ता आहे. सन १९७२ साली रोजगार हमी योजनेतून हा र्स्ता झाला होता. तेव्हापासून एकदाही ना खडीकरण ना डांबरीकरण झाले नाही. वाळूज येथील शेतकऱ्यांनी यापूर्वी तालुका हदीपर्यंत पडलेले खड्डे लोकवर्गणीतून बुजविले आहेत. रस्त्याच्या दुतर्फा काटेरी झुडपी वाढली आहे. हा रस्ता दुरुस्ती करावा, अशी मागणी वाहनधारक, शेतकरी यांच्यातून होत आहे.
--
येलमवाडीकरांची स्मशानभूमीची मागणी
वाळूज : मोहोळ तालुक्यातील अगदी शेवटच्या टोकाचे येलमवाडी हे गाव. ग्रामपंचायत स्थापन झाल्यापासून या गाावाला स्मशानभूमी मिळालेली नाही. गावाकुसा लगत ओढयाच्या काठी मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जातात. या ठिकाणी रस्ताही नाही. काटेरी झाडे आडवी वाढलेली आहेत. या ठिकाणी पाणी आणि वीजदेखील नाही. गावासाठी कायमस्वरूपी स्मशानभूमी व्हावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.