वृद्धाकडील १0 तोळ्याचे दागिने लंपास
By admin | Published: May 11, 2014 01:23 AM2014-05-11T01:23:29+5:302014-05-11T01:23:29+5:30
सोलापूर :
सोलापूर : आम्ही पोलीस आहोत, लोकसभा निवडणुकीनिमित्त तपासणी सुरू आहे अशी थाप मारून दोघा भामट्यांनी वृद्धाच्या पिशवीतील १0 तोळे दागिने असलेला डबा हातोहात लंपास केल्याची घटना जुळे सोलापुरात शुक्रवारी सकाळी घडली. भीमाशंकर संगप्पा उंबरजे (६२, रा. ४१ बी, कोळी समाज सोसायटी गृहनिर्माण संस्था नं. २, सैफुल) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोघा भामट्यांविरूद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उंबरजे हे ९ मे रोजी सकाळी पावणेनऊ वाजता केरूर (ता.इंडी) येथे जाण्यासाठी निघाले होते. ते चालत सैफुल बस स्टॉपकडे जात असताना वाटेत पाठीमागून मोटरसायकलवरून आलेल्या दोघांनी त्यांना अडविले. आम्ही पोलीस आहोत, निवडणुकीची तपासणी सुरू आहे, तुमच्या बॅगेत पुड्या आहेत असे आम्हाला समजले आहे असे म्हणून जवळ येऊन त्यांनी उंबरजे यांच्या हातातील प्रवासी बॅग ताब्यात घेतली. बॅग उघडून त्यांनी तपासणी केली. या डब्यात काय आहे असे त्यांनी विचारले.त्यात दागिने आहेत म्हटल्यावर नीट सांभाळून ठेवा असे म्हणत सर्व आवराआवर करून चेन ओढून बॅग त्यांनी परत केली व मोटरसायकलवर बसून दोघे निघून गेले. थोडे चालून गेल्यावर नटराज जनरल स्टोअर्सजवळ त्यांनी बॅग तपासून पाहिल्यावर दागिन्याचा डबा गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनाला आले. डब्यात पाच तोळ्याची मोहन माळ, अडीच तोळ्याचा नेकलेस, एक तोळ्याची सोनसाखळी, १ तोळ्याचा हार असे अडीच लाखांचे दागिने होते