हत्तूर ते बोरामणी बायपाससाठी भूसंपादन सुरू, पालकमंत्री देशमुख यांचा पाठपुरावा : २५ किमीचा बाह्यवळण रस्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 02:46 PM2017-12-14T14:46:26+5:302017-12-14T14:47:50+5:30

हैदराबाद ते विजयपूर महामार्गाला सोलापुरातून बाह्यवळण देण्यासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या बोरामणी ते हत्तूर (२५.३८ किमी) बाह्यवळण रस्त्यासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

Land acquisition for Hastur by Bormani bypass, follow up to Guardian Minister Deshmukh: 25 km outlying road | हत्तूर ते बोरामणी बायपाससाठी भूसंपादन सुरू, पालकमंत्री देशमुख यांचा पाठपुरावा : २५ किमीचा बाह्यवळण रस्ता

हत्तूर ते बोरामणी बायपाससाठी भूसंपादन सुरू, पालकमंत्री देशमुख यांचा पाठपुरावा : २५ किमीचा बाह्यवळण रस्ता

googlenewsNext
ठळक मुद्देबाधित होणारी जमीन आणि जमीन मालकांच्या नावाची यादी लवकरच शासनाकडून जाहीर होणार बाह्यवळण रस्त्यासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरूसोलापूर-बार्शी रस्त्याचे कामही मार्गी


राकेश कदम
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि १४  : हैदराबाद ते विजयपूर महामार्गाला सोलापुरातून बाह्यवळण देण्यासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या बोरामणी ते हत्तूर (२५.३८ किमी) बाह्यवळण रस्त्यासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. बाधित होणारी जमीन आणि जमीन मालकांच्या नावाची यादी लवकरच शासनाकडून जाहीर होणार आहे. 
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून सोलापूर ते हैदराबाद रस्त्याचे चौपदरीकरण सुरू आहे. हे काम खूपच संथगतीने सुरू असल्याच्या तक्रारी येत आहेत. दुसरीकडे सोलापूर ते विजयपूर चौपदरीकरणाच्या तिसºया करारनाम्याचे काम सुरू आहे. या कामांतर्गत बाळे ते हत्तूर या दरम्यान बाह्यवळण प्रस्तावित करण्यात आलेले आहे. त्याच पद्धतीने हैदराबाद ते विजयपूर महामार्गावरून येणाºया वाहनांना बोरामणी ते हत्तूर बाह्यवळण देण्याचा प्रस्ताव होता. पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी मागील महिन्यात यासंदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाºयांसोबत बैठक घेतली होती. त्यानुसार अधिकाºयांनी आराखडा करून जिल्हा प्रशासनाकडे दिला आहे. जिल्हा प्रशासनाने भूसंपादनाची प्रक्रिया सुरू केली आहे. 
------------------------
- सोलापूर-बार्शी रस्त्याचे कामही मार्गी 
केंद्र सरकारने महामार्गाच्या चौपदरीकरणासोबत काही शहरांना जोडणाºया दुपदरीकरणाच्या कामांचे प्रस्ताव मंजूर केले आहेत. यामध्ये औराद शहाजनी-निलंगा-उस्मानाबाद-तुळजापूर-बार्शी मार्गाचा समावेश होता. राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या अधिकाºयांनी हे काम बार्शीवरून पुढे सोलापूरपर्यंत आणण्यात यश मिळवले आहे. सोलापूर-बार्शी मार्गावर माळढोक अभयारण्य परिक्षेत्रही येते. परंतु, नव्या कामासाठी जादा जमीन लागणार नाही. त्यामुळे उपलब्ध जागेवरच उत्तम दुपदरीकरण केले जाणार आहे. 
----------------
- रस्त्याच्या चारही बाजूंचे महामार्ग पूर्ण करतानाच रिंगरोडचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. यात बोरामणी ते हत्तूर, हत्तूर ते बाळे असा मार्ग साकारण्यात येईल. हे मार्ग पुढे हैदराबाद रस्त्यावर बोरामणी येथे जोडले जातील. तूर्तास दोन बाह्यवळणांसाठी प्राधान्याने काम केले जात आहे. 
------------------
- हत्तूर ते बोरामणी बाह्यवळण रस्त्याच्या कामासाठी भूसंपादनाची प्रक्रिया लवकरच सुरू करावी, असे आदेश अधिकाºयांना दिले आहेत. हा रस्ता सोलापूर शहरातील वाहतुकीची कोंडी रोखण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. याशिवाय शहरातील दोन उड्डाण पुलांच्या कामासाठी भूसंपादन करण्यात येत आहे. यासाठी १२० कोटी रुपयांची गरज आहे. यासंदर्भातील प्रस्ताव तयार करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर करण्यात येणार आहे. बाधित लोकांना इतर प्रकारेही मदत करण्यात येणार आहे. 
- विजयकुमार देशमुख, 
पालकमंत्री. 
-----------------
असा होणार मार्ग 
- बोरामणी-मुळेगाव-कुंभारी-होटगी-हत्तूर (एकूण २५.३८ किमी). या कामामुळे हैदाराबाद-विजयपूर महामार्गाबरोबरच सोलापूर-तुळजापूरमार्गे येणारी वाहने मार्केट यार्ड चौकातून येण्याऐवजी थेट बाह्यवळणावरून हत्तूरकडे जाऊ शकतील. या रस्त्याचा प्रस्ताव २०११ मध्ये तयार करण्यात आला होता, परंतु काम आता मार्गी लागले आहे. 

Web Title: Land acquisition for Hastur by Bormani bypass, follow up to Guardian Minister Deshmukh: 25 km outlying road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.