येणकीच्या जकराया तीर्थक्षेत्र विकासकामांचे भूमिूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:23 AM2021-02-16T04:23:19+5:302021-02-16T04:23:19+5:30
येणकी येथील जकराया देवस्थानच्या सुधारणा करण्यासाठी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून ब वर्गात समावेश करून १ कोटी ७१ लाख रुपये ...
येणकी येथील जकराया देवस्थानच्या सुधारणा करण्यासाठी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून ब वर्गात समावेश करून १ कोटी ७१ लाख रुपये मंजूर झाले. त्या कामाचे भूमिपूजन रविवारी सभापती विजयराज डोंगरे व जि. प. सदस्या शैला गोडसे यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जकराया साखर कारखान्याचे चेअरमन ॲड. बी. बी. जाधव, दामोदर घुले, पं. स. सदस्य नागराज पाटील यांची भाषणे झाली.
यावेळी जकराया शूगर्सचे अध्यक्ष ॲड. बी. बी. जाधव, नागराज पाटील, उद्योजक रामचंद्र पतंगे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष पांडुरंग बचुटे, सरचिटणीस बाळासाहेब पवार, सुनील पाटील, सादिक तांबोळी, दीपक गवळी, माजी सरपंच हरिभाऊ घुले, बंडू सरवळे, विनोद कदम,
विशाल पवार, अजिंक्य गायकवाड, विवेक पाटील युवराज शिंदे, अज्जू फुलारी, सूर्यकांत गुजरे, विलास तिवारी, वसंत गुंड, कल्याण गुंड, सीताराम जाधव, म्हाळप्पा पाटील, वाल्मीक पाटील, गहिनीनाथ जाधव, अंकुश जगताप, सिद्धेश्वर बरडे आदी मान्यवर उपस्थित होते.
फोटोओळ : १५ कुरूल-रोड
येणकी येथील जकराया देवस्थानच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत विकास कामाचे भूमिपूजन करताना सभापती विजयराज डोंगरे, सदस्य शैला गोडसे, ॲड. बी.बी. जाधव, हरिभाऊ घुले आदी.
---