रुई येथे जमिनीच्या वादातून घर पेटवले; ६० हजारांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:16 AM2021-07-02T04:16:06+5:302021-07-02T04:16:06+5:30
याबाबत सुखदेव ज्ञानदेव जाधव (५५, रा. रुई) यांच्या फिर्यादीवरून टेंभुर्णी पोलिसांनी सुनीता काळे, सतीश लांडगे व दादा काळे (सर्व ...
याबाबत सुखदेव ज्ञानदेव जाधव (५५, रा. रुई) यांच्या फिर्यादीवरून टेंभुर्णी पोलिसांनी सुनीता काळे, सतीश लांडगे व दादा काळे (सर्व रा. रुई) यांच्याविरुद्ध भादवि कलम ४३६, ५०४,५०६ नुसार गुन्हा नोंदला आहे.
फिर्यादी सुखदेव जाधव यांचे रुई येथील गायरान जमिनीमध्ये पाशिटाचे घर होते. ३० जून रोजी सायंकाळी पाच वाजता सुनीता काळे, सतीश लांडगे व दादा काळे हे तिघे तेथे गेले. हे गायरान आम्ही धरले आहे. येथे आम्हांला घर बांधावयाचे आहे. तुला एक आठवड्यापासून घर काढा असे सांगितले आहे तरीही तू घर काढले नाही म्हणून सुखदेव जाधव याच्याशी भांडू लागले. याचवेळी तिघांनी जाधव यांचे घर पेटवून दिले. यात घरातील कपडे, ५० किलो बाजरी, २० किलो गहू व शेंगा, संसारोपयोगी वस्तू व रोख २० हजार रुपये असे एकूण ६० हजार रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शितोळे करीत आहेत.
---