कुरुल ग्रामपंचायतीवर लांडे गटाचे वर्चस्व कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:22 AM2021-01-20T04:22:44+5:302021-01-20T04:22:44+5:30
कुरुल : मोहोळ तालुक्यातील अत्यंत महत्त्वाची समजली जाणाऱ्या कुरुल ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत मोहोळ पंचायत समीतीचे सदस्य जालिंदर लांडे यांच्या ...
कुरुल : मोहोळ तालुक्यातील अत्यंत महत्त्वाची समजली जाणाऱ्या कुरुल ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत मोहोळ पंचायत समीतीचे सदस्य जालिंदर लांडे यांच्या गटाने १७ पैकी ११ जागा जिंकून ग्रामपंचायतीवर वर्चस्व कायम ठेवले आहे. तर विरोधक अण्णासाहेब पाटील व लिंगदेव निकम गटानेही जोरदार लढत देत ६ जागांवर विजय मिळवून ग्रामपंचायतीत शिरकाव केला.
गेल्या २० वर्षापासून या ग्रामपंचायतीवर जालिंदर लांडे गटाची एकहाती सत्ता आहे. प्रभाग क्रमांक चार व प्रभाग क्रमांक पाच मध्ये अत्यंत चुरशीची लढत झाली. परिणामत लांडे गटाला एकही जागा जिंकता आली नाही. केचुआई परिवर्तन पॅनलचे प्रभाग तीन मधील दोन्ही उमेदवार फार कमी मतांनी पराभूत झाले. प्रभाग सहा मधून पॅनल प्रमुख लिंगदेव निकम यांनाही पराभवाचा सामना करावा लागला.
----
प्रभाग दोन मध्ये पॅनलप्रमुख जालिंदर लांडे यांनी जय जगदंबा आदर्श पॅनलच्या बालेकिल्ल्यात पूत्र सीताराम लांडे यांना पहिल्यांदाच गावपातळीवरच्या निवडणुकीत उतरवले होते. सीताराम लांडे यांनी यापूर्वी माजी महापौर ऍड .यू एन बेरिया यांच्या विरोधात २०० च्या सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावर प्रभाग दोन मधून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांना अवघ्या ९० मतांनी पराभव पत्करावा लागला होता. या निवडणूकीत ते २९ मतांनी विजय झाला आहे .
---
विजयी उमेदवार : प्रभाग क्र.१: तानाजी गायकवाड (५१४), बाळासाहेब लांडे (५०४), अंजली गायकवाड (५१५).
प्रभाग क्रमांक २: सीताराम लांडे (३९३), मोहिनी घोडके (४४३) शिला माने (३८५). प्रभाग क्रमांक ३ : रोहिणी तगवाले (३३४), चंद्रकला पाटील (३४७).
प्रभाग क्रमांक ६ : सुभाष माळी (३३६), पांडुरंग जाधव (३५२), शंनू मुलानी (३७६),
अण्णासाहेब पाटील व लिंगदेव निकम यांच्या नेतृत्वाखालील जय केचुआई परिवर्तन पॅनेलने दोन प्रभागातील सहा जागांवर यश मिळवले आहे. प्रभाग क्रमांक ४: गहिनीनाथ जाधव (४८१), रुक्मिणी माळी (४३५), कल्पना जाधव (४६९),
प्रभाग क्रमांक ५ : प्रकाश जाधव (४७०), संगीता शिंदे (४४४), कविता निकम (४१६) हे उमेदवार विजयी झाले.