मोठ्या ग्रामपंचायतींना कोविड केअर सेंटर उभारण्याचे निर्देश द्यावेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:22 AM2021-04-27T04:22:51+5:302021-04-27T04:22:51+5:30

सांगोला शहर व तालुक्यात कोरोनाचा वेगाने प्रसार होत आहे. ग्रामीण भागात दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत सांगोला शहरात ...

Large Gram Panchayats should be instructed to set up Covid Care Centers | मोठ्या ग्रामपंचायतींना कोविड केअर सेंटर उभारण्याचे निर्देश द्यावेत

मोठ्या ग्रामपंचायतींना कोविड केअर सेंटर उभारण्याचे निर्देश द्यावेत

googlenewsNext

सांगोला शहर व तालुक्यात कोरोनाचा वेगाने प्रसार होत आहे. ग्रामीण भागात दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत सांगोला शहरात अधिग्रहित केलेली कोविड हॉस्पिटल व कोविड केअर सेंटर रुग्णांना दाखल करून घेण्यासाठी कमी पडत आहेत. त्यामुळे कोरोनाग्रस्त रुग्णांवर वेळेवर उपचार मिळण्यासाठी मोठी अडचण निर्माण होत आहे. शुक्रवारी सांगोल्यात पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बैठक संपल्यानंतर कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवर चिंता व्यक्त करताना मोठ्या ग्रामपंचायतीच्या ठिकाणी कोविड सेंटर उभारण्याचे सुतोवाच केले होते. त्या अनुषंगाने महूद येथे कोव्हिड केअर सेंटरची उभारणी होऊ शकते, अशी माहिती माजी ग्रा. पं. सदस्य महेंद्र बाजारे यांनी केली दिली.

कोट ::::::::::::::

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी महूद, घेरडी, कोळा, जवळा, अकोला, नाझरे या ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक यांच्यासमवेत व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे संपर्क साधून चर्चा केली आहे. येत्या दोन-चार दिवसांत मोठ्या ग्रामपंचायतीच्या ठिकाणी कोविड सेंटर उभारण्याचे नियोजन झाले आहे तशा सूचना संबंधित ग्रामपंचायतींना दिल्या आहेत. यासाठी निधी मिळणार नाही. ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन गावातील दानशूर व्यक्तींच्या मदतीने ही यंत्रणा उभी करायची आहे.

- संतोष राऊत

गटविकास अधिकारी, सांगोला

Web Title: Large Gram Panchayats should be instructed to set up Covid Care Centers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.