निवडणूक बिनविरोधसाठी कर्देहळ्ळीत मोठ्या रकमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:19 AM2020-12-24T04:19:57+5:302020-12-24T04:19:57+5:30

कर्देहळ्ळी येथे ग्रामपंचायतीची निवडणूक नेहमीच चुरशीने होते त्यातून ग्रामस्थांमध्ये आलेली कटुता पाच वर्षे टिकून राहते याचा वाईट अनुभव आल्याने ...

Large sums of money in Kardehalli for election unopposed | निवडणूक बिनविरोधसाठी कर्देहळ्ळीत मोठ्या रकमा

निवडणूक बिनविरोधसाठी कर्देहळ्ळीत मोठ्या रकमा

Next

कर्देहळ्ळी येथे ग्रामपंचायतीची निवडणूक नेहमीच चुरशीने होते त्यातून ग्रामस्थांमध्ये आलेली कटुता पाच वर्षे टिकून राहते याचा वाईट अनुभव आल्याने येथील उद्योजक सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी निवडणूक बिनविरोध करण्याचे कळकळीचे आवाहन केले आहे. त्यासाठी स्वतः मोठ्या रकमा विकास कामासाठी देण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे.

अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी त्यांच्या मतदारसंघातील ज्या गावांची निवडणूक बिनविरोध होईल अशा गावांना प्रत्येकी पंधरा लाख रुपयांचा विकास निधी देण्याची घोषणा आज केली आहे. त्यामुळे गावोगावी सुरू असलेली निवडणुकीची तयारी आणि पॅनल उभा करण्याची चर्चा काही अंशी थंडावली आहे.

कर्देहळ्ळी येथील उद्योजक भरत भीमराव माने यांनी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध केल्यास गावासाठी एक लाख रुपयाचा निधी देण्याची तयारी दर्शविली आहे. प्रगतिशील शेतकरी दत्तात्रय कांबळे आणि ममता मेडिकलचे हरिदास पौळ यांनी प्रत्येकी ५१ हजार रुपये देण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे निवडणुकीची आतूर असलेल्या उत्साही कार्यकर्त्यांना आता आता चाप बसणार असल्याची चर्चा आहे.

-----

Web Title: Large sums of money in Kardehalli for election unopposed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.