दहा वर्षांत सोलापूर लोकसभा मतदारसंघात चाललाच नाही अपक्षांचा बोलबाला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 12:17 PM2019-04-11T12:17:12+5:302019-04-11T12:18:52+5:30

लोकमत स्पेशल रिपोर्ट । २००४ ला भाजपला लॉटरी, काँग्रेसला बसला आश्चर्यकारक फटका

In the last 10 years, the independence of the Solapur Lok Sabha constituency has not run! | दहा वर्षांत सोलापूर लोकसभा मतदारसंघात चाललाच नाही अपक्षांचा बोलबाला !

दहा वर्षांत सोलापूर लोकसभा मतदारसंघात चाललाच नाही अपक्षांचा बोलबाला !

Next
ठळक मुद्देसध्या सर्वत्रच लोकसभा  निवडणुकीसाठी प्रचाराचा धुराळा चांगलाच उडू लागला सोलापूर जिल्ह्यात मात्र गत दोन पंचवार्षिक निवडणुकीत अपक्षांची  दुसºया क्रमांकावरील उमेदवाराला मिळालेली नाही२००४ च्या निवडणुकीत मात्र अपक्षांमुळे काँग्रेसच्या उज्ज्वला शिंदे यांना फटका बसला

विलास जळकोटकर

सोलापूर : सध्या सर्वत्रच लोकसभा  निवडणुकीसाठी प्रचाराचा धुराळा चांगलाच उडू लागला आहे. अनेक ठिकाणी बंडखोरी करुन अपक्ष निवडणूक लढवणाºया उमेदवाराचा फटका विजयाच्या दृष्टिक्षेपात असणाºया उमेदवाला मिळालेला आहे. सोलापूर जिल्ह्यात मात्र गत दोन पंचवार्षिक निवडणुकीत अपक्षांची  दुसºया क्रमांकावरील उमेदवाराला मिळालेली नाही हे आकडेवारीवरुन स्पष्ट होते. २००४ च्या निवडणुकीत मात्र अपक्षांमुळे काँग्रेसच्या उज्ज्वला शिंदे यांना फटका बसला. भाजपच्या सुभाष देशमुखांना विजयाच्या रुपाने लॉटरी लागली.

२००९ च्या सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारामध्ये चुरशीची लढत होऊन काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे ९९,६१२ मतांच्या फरकाने विजयी झाले. त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी भाजपचे शरद बनसोडे हे २,८७,८७० मतांनी पराभूत झाले. या निवडणुकीत ७ अपक्ष रिंगणात होते. या सर्वांना मिळून २७,९७६ मते मिळाली. ही आकडेवारी विजयाच्या मार्जिनमध्ये जमा केली तरी इथे अपक्ष डोकेदुखी ठरले नसल्याचेच स्पष्ट होते.

गत २०१४ च्या लोकसभा निवडणुकीवर दृष्टिक्षेप टाकला तरीही असेच चित्र दिसते. त्यावेळीही काँग्रेसकडून सुशीलकुमार शिंदे आणि भाजपकडून शरद बनसोडे यांचीच उमेदवारी होती. या निवडणुकीत भाजपचे बनसोडे १,४९,३८१ मताधिक्याने विजयी झाले. यावेळी १० अपक्ष रिंगणात होते. त्यांना मिळालेल्या मतांची बेरीज केवळ १९,१८० होती म्हणजे ही मते पराभूत उमेदवाराच्या खात्यात टाकूनही विजयाचे समीकरण जुळले नसते. 

२००४ च्या निवडणुकीत उमेदवार कमी तसे अपक्षांची संख्या केवळ २ असतानाही त्यांनी मिळवलेली ११ हजार ७६० मते काँग्रेसच्या उज्ज्वला शिंदे यांना डोईजड ठरले. भाजपचे सुभाष देशमुख यांचा निसटता विजय झाला अशीच मतदानाची आकडेवारी सांगते.

२००४ मध्ये अपक्षांचा करिश्मा
- सन २००४ च्या लोकसभा निवडणुकीत मात्र अपक्षांचा करिश्मा चालल्याचे दिसते. इथे काँग्रेसच्या उज्ज्वला शिंदे यांना अपक्ष उमेदवार डोकेदुखी ठरले. यावेळी एकूण सहा जण रिंगणामध्ये होते. त्या दोन अपक्षांना मिळालेल्या मतांची बेरीज ११,७६० होते. भाजपचे सुभाष देशमुख यांनी ३,१६,१८८ मते मिळवून विजयी झाले. निकटच्या काँग्रेसच्या उज्ज्वला शिंदे यांना ३१०३९० मते मिळाली. त्यांना केवळ ५,७९८ मतांनी पराभव चाखावा लागला. इथे अपक्षांची उमेदवारी विजयाला अडसर ठरल्याचा इतिहास सोलापूरकर जाणून आहेत.

Web Title: In the last 10 years, the independence of the Solapur Lok Sabha constituency has not run!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.