‘अमर रहे’ च्या जयघोषात शहीद धनाजी होनमाने यांना अखेरचा निरोप

By appasaheb.patil | Published: May 18, 2020 02:47 PM2020-05-18T14:47:23+5:302020-05-18T14:51:17+5:30

शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; पुळूज ग्रामस्थांनी फिजिकल डिस्टस्टिंगचे केले पालन

Last farewell to martyr Dhanaji Honmane in the triumph of 'Amar Rahe' | ‘अमर रहे’ च्या जयघोषात शहीद धनाजी होनमाने यांना अखेरचा निरोप

‘अमर रहे’ च्या जयघोषात शहीद धनाजी होनमाने यांना अखेरचा निरोप

Next
ठळक मुद्देवीरपुत्र गमावल्याचे दु:ख तर देशासाठी बलीदान देणाºया पुत्राचा अभिमान असे भाव प्रत्येकाच्या चेहºयावर होतेसोमवारी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शहीद होनमाने यांच्या कुटुंबियांची भेट घेतली

चळे/ सोलापूर : गडचिरोली येथे नक्षलवाद्यांनी केलेल्या गोळीबारात पुळूज (ता़ पंढरपूर) येथील शेतकरी कुटुंबातील जवान धनाजी होनमाने यांना वीरमरण आले होते. त्यांच्यावर त्यांचे मुळगाव पुळूज (ता़ पंढरपूर) येथील जिल्हा परिषद शाळेच्या पटांगणात दुपारी दोनच्या सुमारास शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.  विराट जनसमुदायांच्या साक्षीने 'अमर रहे... अमर रहे ...शहीद धनाजी होनमाने अमर रहे' च्या जयघोषात साश्रुनयनांनी अंत्यसंस्कार करण्यात आले. 

शीघ्र कृती पथक (क्यूआरटी) आणि विशेष अभियान पथकाचे जवान रविवारी सकाळी ६ वाजेपासून संयुक्तपणे नक्षलविरोधी अभियान राबवीत होते. ६.३० च्या सुमारास दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी अचानक गोळीबार केला.  पोलिसांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. पण नक्षलवाद्यांच्या गोळीने क्युआरटी पथकाचे उपनिरीक्षक होनमाने हे शहीद झाले. शहीद झाल्याची वार्ता पुळूज येथे समजताच पुळूज गावावर शोककळा पसरली. शहीद होनमाने यांचे पार्थिव सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास पुळूजमध्ये दाखल झाले. त्यानंतर शहीद होनमाने यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी गावातील नागरिकांनी घरासमोरच थांबून त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. शहीद धनाजी होनमाने याच्या पार्थिवास मोठे बंधू विकास होनमाने यांनी मुखाग्नी दिला.

सोमवारी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शहीद होनमाने यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी बोलताना पालकमंत्री भरणे म्हणाले की, शहीद होनमाने यांच्या कुटुंबियांना शासनाच्यावतीने सर्वोतोपरी मदत केली जाईल़ त्यांच्या भावाला शासकीय नोकरी तर आई-वडिलांना पेन्शन मिळवून देण्याचाही प्रयत्न करणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सागर कवडे यांच्यासह अन्य शासकीय अधिकारी व पोलीस अधिकाºयांनी पार्थिवावर पुष्पचक्र वाहून आदरांजली वाहिली. यावेळी वीरपुत्र गमावल्याचे दु:ख तर देशासाठी बलीदान देणाºया पुत्राचा अभिमान असे भाव प्रत्येकाच्या चेहºयावर होते. 

Web Title: Last farewell to martyr Dhanaji Honmane in the triumph of 'Amar Rahe'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.