जीवनगौरव पुरस्कारासाठी सोलापुरात आलेल्या राजा ढालेंची भेट ठरली शेवटची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 02:20 PM2019-07-17T14:20:42+5:302019-07-17T14:24:03+5:30

चळवळ पोरखी झाली; शहर-जिल्ह्यात वाहण्यात आली श्रद्धांजली; चळवळींच्या आठवणीला उजाळा

Last visitor to Shilpara king of Sholapur for Lifetime Achievement Award | जीवनगौरव पुरस्कारासाठी सोलापुरात आलेल्या राजा ढालेंची भेट ठरली शेवटची

जीवनगौरव पुरस्कारासाठी सोलापुरात आलेल्या राजा ढालेंची भेट ठरली शेवटची

Next
ठळक मुद्देदलित पँथरच्या स्थापनेनंतर राजा ढाले व नामदेव ढसाळ हे पट्टीचे दोन लेखक अन् साहित्यिकांचं नेतृत्व महाराष्ट्रात उदयास आलं. १५ आॅगस्ट १९७२ च्या साधना विशेषांकात राजा ढाले यांचा ‘काळा स्वातंत्र्यदिन’ हा लेख प्रसिद्ध झालाविचाराने वेगळ्या असलेल्या पण एकदिलाने काम करणाºया तरुणांची संघटना म्हणून सुरुवातीच्या पँथर चळवळीकडे पाहिले गेले

संताजी शिंदे 

सोलापूर : दलितांचा मुक्तीलढा सर्वंकष क्रांती इच्छितो. भागश: बदल आम्हाला नको... आम्हाला आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रांत वरिष्ठ स्थानांवर आमचे प्रभुत्व स्थापन करावे लागेल. आता आम्ही अल्पसंतुष्ट राहणार नाही. आम्हाला ब्राह्मण आळीत जागा नको. आम्हाला साºया देशाचे राज्य पाहिजे. आमचे लक्ष्य केवळ व्यक्ती नसून व्यवस्था आहे. अशी भूमिका मांडून २९ मे १९७२ रोजी स्थापन केलेल्या दलित पँथरचे संस्थापक राजा ढाले यांची एप्रिल २०१८ मधील सोलापूरची भेट शेवटची ठरली. सम्यक विचार मंचच्या वतीने त्यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला होता. 

दलित पँथरच्या स्थापनेनंतर राजा ढाले व नामदेव ढसाळ हे पट्टीचे दोन लेखक अन् साहित्यिकांचं नेतृत्व महाराष्ट्रात उदयास आलं. १५ आॅगस्ट १९७२ च्या साधना विशेषांकात राजा ढाले यांचा ‘काळा स्वातंत्र्यदिन’ हा लेख प्रसिद्ध झाला. या लेखाने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली व दलित पँथरला प्रसिद्धी मिळाली. दलित पँथर जेव्हा सुरू झाली तेव्हा हजारोंच्या संख्येने तरुणांनी पँथरमध्ये प्रवेश केला. प्रत्येकाला पँथरही आपल्या मनातील असंतोषाचे व्यासपीठ वाटत होतं. सर्व तरुण बेदरकार होते. विचाराने वेगळ्या असलेल्या पण एकदिलाने काम करणाºया तरुणांची संघटना म्हणून सुरुवातीच्या पँथर चळवळीकडे पाहिले गेले.

आंबेडकर चळवळीचा बालेकिल्ला असलेल्या सोलापुरात राजा ढाले हे नेहमी येत होते. १९७४ साली सुभाष चौकात दलित पँथरच्या प्रचारासाठी मोठी सभा आयोजित करण्यात आली होती. सभेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार रंगाअण्णा वैद्य हे होते. यावेळी वक्ते म्हणून राजा ढाले व अरुण कांबळे हे उपस्थित होते. सुभाष चौकातील सभा चांगलीच गाजली होती.  सम्यक विचार मंचच्या वतीने एप्रिल २0१८ मध्ये आयोजित केलेल्या मिलिंद व्याख्यानमालेत त्यांनी ‘फुले-शाहू-आंबेडकरी चळवळ: बहुजनांची पे्रेरणा’ या विषयावर व्याख्यान दिले होते. सत्ताधाºयांना राज्यघटना राबवायची नाही, विषमतावादी व्यवस्था आणायची आहे. असे जर झाले तर येणाºया काळात देशात ज्वालामुखी निर्माण होईल आणि त्याला कोणी रोखू शकणार नाही, असे परखड मत राजा ढाले यांनी व्यक्त केले होते. आंबेडकरी चळवळीचा गाढा अभ्यासक असलेल्या राजा ढाले यांची सोलापूर भेट ही शेवटची ठरली. 

देशात अन्याय, अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली होती, तेव्हा महाराष्ट्रात राजा ढाले, ज.वी. पवार, नामदेव ढसाळ, अरुण कांबळे आदींच्या नेतृत्वाखाली दलित पँथरची स्थापना झाली. राजा ढाले यांचा सोलापूरशी चांगला ऋणानुबंध होता. त्यांच्या जाण्याने धगधगत्या आंबेडकरी चळवळीतील नेता हरपला आहे. 
- राजाभाऊ सरवदे, 
अध्यक्ष, महात्मा फुले मागासवर्गीय महामंडळ, महाराष्ट्र राज्य. 

दलित पँथरच्या नेतृत्वासह एक थोर विचारवंत, वस्तुनिष्ठ लेखक, परखड आंबेडकरवाद मांडणारा बुद्धिवंत, कुशल संघटक, फरडा वक्ता आज आम्हाला सोडून गेला. दलित पँथरचे वैचारिक आक्रमक नेतृत्व आम्हाला सोडून गेल्याने आंबेडकरी चळवळ पोरखी झाली आहे. 
- राजाभाऊ इंगळे
प्रदेश उपाध्यक्ष, पीपल्स रिपब्लिकन पार्टी

पँथरमधून बाहेर पडल्यानंतर कोणत्याही पक्षाचा शिक्का मारून घेतला नाही. राजा ढाले नावाची आंबेडकरी चळवळ त्यांनी उभी केली. वैचारिक बैठक असलेले राजा ढाले हे शेवटपर्यंत आंबेडकरी चळवळीशी निष्ठेने राहिले. त्यांच्या जाण्याने आंबेडकरी चळवळीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. 
- सुभानजी बनसोडे
माजी नगरसेवक, आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते

Web Title: Last visitor to Shilpara king of Sholapur for Lifetime Achievement Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.