उशीरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सीईओंनी सुनावले, विना वेतन करण्याची ताकीद; शिस्त पाळण्याच्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2023 02:55 PM2023-08-09T14:55:47+5:302023-08-09T14:56:09+5:30

जिल्हा परिषदेत मागील आठवड्यात उशीरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सीईओ मनिषा आव्हाळे यांनी चांगलेच सुनावले.

Late workers warned by CEOs to do without pay; Disciplinary instructions | उशीरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सीईओंनी सुनावले, विना वेतन करण्याची ताकीद; शिस्त पाळण्याच्या सूचना

उशीरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सीईओंनी सुनावले, विना वेतन करण्याची ताकीद; शिस्त पाळण्याच्या सूचना

googlenewsNext

शीतलकुमार कांबळे

सोलापूर : जिल्हा परिषदेत मागील आठवड्यात उशीरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सीईओ मनिषा आव्हाळे यांनी चांगलेच सुनावले. कामामध्ये शिस्त पाळण्याच्या सूचना दिल्या. नाहीतर त्या दिवसाचे काम विनावेतन करण्याची ताकीद त्यांनी दिली.

जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात बुधवार ९ ऑगस्ट रोजी क्रांतीदिनानिमित्त “माझी माती माझा देश” उपक्रम अंतर्गत पंचप्रण शपथ देण्यात आली. सीईओ मनिषा आव्हाळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, अमोल जाधव, यांच्यासह विभाग प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.

सीईओ मनिषा आव्हाळे यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी पंचप्रण शपथेचे वाचन केले. पंचप्रण शपथ कर्मचारी यांनी जीवनात अंगीकारा, पुन्हा पुन्हा स्मरण करा, वेळेत कार्यालयात या, प्रलंबित कामांचा निपटारा करा, असे आवाहन सीईओ मनिषा आव्हाळे यांनी केले.

तर सेवा पुस्तकात नोंद

९ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सर्व कर्मचारी एकत्र आले होते. मागच्या आठवड्यात उशीरा आलेले कर्मचारी यांना थांबवून त्यांनी सुधारणा करणेबाबत सूचना दिल्या. कामात सुधारणा नाही झाले तर सेवा पुस्तकात नोंद घेण्यात येईल, अशा शब्दात सुनावले.

Web Title: Late workers warned by CEOs to do without pay; Disciplinary instructions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.