अ. लतीफ नल्लामंदू यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:21 AM2021-04-17T04:21:42+5:302021-04-17T04:21:42+5:30

सोलापूर : ज्येष्ठ पत्रकार, सोलापूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष व शमा उर्दू प्राथमिक शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक, ‘कासिदकार’ ...

A. Latif Nallamandu passed away | अ. लतीफ नल्लामंदू यांचे निधन

अ. लतीफ नल्लामंदू यांचे निधन

Next

सोलापूर : ज्येष्ठ पत्रकार, सोलापूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष व शमा उर्दू प्राथमिक शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक, ‘कासिदकार’ हाजी अ. लतीफ नल्लामंदू (८६, रा. साखरपेठ, सोलापूर) यांचे शुक्रवारी निधन झाले.

गेल्या ४६ वर्षापासून प्रकाशित होणाऱ्या कासिदचे संस्थापक, जिल्हा मराठी पत्रकार भवनाचे संस्थापक सचिव, पहिले अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक खजिनदार म्हणूनही त्यांनी अनेक विधायक कार्य केले. बिहार प्रेस काळा कायदा विरोधात झालेल्या आंदोलनात सहभागी घेऊन सात दिवसाची नजरकैदेची शिक्षा भोगली. त्यांना औरंगाबादेतील हरसूल कारागृहात कैदेत ठेवण्यात आले होते.

हमारे औलीसा, जंगे आजादी में मुसलमानों का योगदान, रौशन सितारे, त्याग मूर्ती सोनिया गांधी, खुशबु जैसे लोग, असे चरित्रमात्मक पुस्तकांचे संपादनही त्यांनी केले होते.

पत्रकारांचे अनेक मागण्या, जाहिरात दरवाढ, विविध समित्यांवर पत्रकारांना घेण्यात यावे अशा अनेक मागण्यासाठी नल्लामंदू यांनी सोलापूर ते मंत्रालयापर्यंत अनेक बैठका, आंदोलने केली आहेत.त्यांना काही संस्थाकडून राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार देऊन गौरविले आहे. ते उर्दू टीचर्स फेडरेशन, उर्दू शिक्षक संघ, संपादक-वृत्तपत्र संघ, संपादक सहकारी संस्था, अ.भा. मराठी पत्रकार परिषदेतही कार्य केले होते.

त्यांच्या पश्चात तीन मुले, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

----

१६ नल्लामंदू

Web Title: A. Latif Nallamandu passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.