जपानमधील अतिश मियावाकी वनस्पती लागवडीचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:20 AM2021-07-25T04:20:04+5:302021-07-25T04:20:04+5:30

सोलापूर वन विभागाकडून वन परिक्षेत्र कार्यालय सांगोला योजना, राज्य योजना, अटल आनंदवन प्रकल्पांतर्गत पहिल्यांदाच शिरभावी येथे अतिश मियावाकी ...

Launch of Atish Miyawaki plant cultivation in Japan | जपानमधील अतिश मियावाकी वनस्पती लागवडीचा शुभारंभ

जपानमधील अतिश मियावाकी वनस्पती लागवडीचा शुभारंभ

Next

सोलापूर वन विभागाकडून वन परिक्षेत्र कार्यालय सांगोला योजना, राज्य योजना, अटल आनंदवन प्रकल्पांतर्गत पहिल्यांदाच शिरभावी येथे अतिश मियावाकी या जपान देशातील वनस्पती शास्त्रज्ञाने विकसित केलेल्या वृक्षाचे रोपण केले. मियावाकी पद्धतीने घनदाट जंगल निर्माण करता येते. जिथे आपण १ हेक्टरवर १ हजार झाडे लावतो तिथे या पद्धतीने ३० हजार झाडे लावली जातात.

यावेळी उपवन संरक्षक धैर्यशील पाटील, सहा. वन संरक्षक बी.जी. हाके, वनपरिक्षेत्र अधिकारी विजय बाटे, वनपाल एस. एस. मुंढे, सरपंच बाळासाहेब बंडगर, माजी सरपंच अभिजित नलवडे, उपसरपंच रोहन जगदाळे, ग्रामसेवक राजकुमार ताठे, सत्यवान सलगर, सिकंदर पवार, धनाजी ताड, अमोल घोंगडे, शिवाजी सरवदे, सुरेश साळुंखे, धैर्यशील नलवडे, बाळदादा नलवडे, नारायण सलगर, भाऊसाहेब घाडगे, काकासाहेब मोरे, ग्रामस्थांसह वन विभागाचे पदाधिकारी व वनरक्षक उपस्थित होते.

फोटो ओळ ::::::::::::::

शिरभावी येथे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते अतिश मियावाकी या वनस्पती लागवडीचा शुभारंभ करण्यात आला.

Web Title: Launch of Atish Miyawaki plant cultivation in Japan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.