नान्नज येथे कोविड केअर सेंटरचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:37 AM2021-05-05T04:37:18+5:302021-05-05T04:37:18+5:30
यामध्ये ६० ऑक्सिजन बेड, १० आयसोलेशन बेड आहेत. रुग्णांना ऑक्सिजन, लॅब, इनव्हेस्टीगेशन, एक्स रे, फार्मसी आणि एक वेळ जेवण ...
यामध्ये ६० ऑक्सिजन बेड, १० आयसोलेशन बेड आहेत. रुग्णांना ऑक्सिजन, लॅब, इनव्हेस्टीगेशन, एक्स रे, फार्मसी आणि एक वेळ जेवण अशी सुविधा देण्यात आली आहे. यापोटी शासन नियमानुसार दर आकारला जातो, आतापर्यंत ६७ रुग्णांना सेवा दिली असून ३७ जणांना घरी सोडण्यात आले आहे. तीन रुग्णांना पुढील उपचारासाठी सोलापूर शहरात पाठवून दिले आहे. नायब तहसीलदार अभिजीत कदम, बीडीओ महादेव बेळ्ळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रल्हाद काशीद यांच्या मार्गदर्शनाखाली हे कोविड सेंटर सुरु झाले. या कोविड केअर सेंटरला डॉ, प्रताप चवरे हे आठवड्यातून दोन वेळा भेट देतात. (वा. प्र.)
----
फाेटो :
नान्नज येथील कोविड केअर सेंटरच्या शुभारंभ प्रसंगी उपसरपंच युवराज पवार, डॉ. प्रीती शिरशेट्टी, सरोजा पवार, चिंदरकर, डॉ. चित्तरंजन भोजने, डॉ. कल्याण शहाणे