सोलापूरातील सिध्दरामेश्वर मंदीरात सुवर्ण शिखर कामाचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 11:04 AM2018-01-10T11:04:44+5:302018-01-10T11:05:44+5:30
सुवर्ण सिद्धेश्वर प्रकल्पातील सवर्ण शिखराच्या शुभारंभ मंगळवारी महापौर शोभाताई बनशेट्टी व देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज कडादी, आपटे ज्वेलर्सचे महेश आपटे, पत्रकार रवींद्र देशमुख, रामेश्वर विभूते यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी देवस्थान पंच कमिटीचे विश्वस्त उपस्थित होते.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि १० : सुवर्ण सिद्धेश्वर प्रकल्पातील सवर्ण शिखराच्या शुभारंभ मंगळवारी महापौर शोभाताई बनशेट्टी व देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज कडादी, आपटे ज्वेलर्सचे महेश आपटे, पत्रकार रवींद्र देशमुख, रामेश्वर विभूते यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी देवस्थान पंच कमिटीचे विश्वस्त उपस्थित होते.
याचवेळी श्री सिद्धेश्वर यात्रेसाठी येणाºया भाविकांच्या महाप्रसादची व्यवस्था देवस्थानच्या दासोहमध्ये करण्यात आली असून एका तासात एक हजार चपाती बनविणाºया चपाती मशीनचे उदघाटन महापौर शोभाताई बनशेट्टी व धर्मराज कडादी यांच्या हस्ते करण्यात आले.
दरम्यान, श्री सिद्धेश्वर मंदिरातील नूतनीकरण केलेल्या साहित्य भांडारचे उदघाटनही महापौर शोभाताई बनशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले. या भांडरमध्ये श्री सिद्धेश्वराविषयक विविध साहित्य, मूर्ती,तैलचित्र आणि पूजेचे साहित्य उपलब्ध आहेत.