मोहोळ येथे खासगी कोविड हॉस्पिटलचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:35 AM2021-05-05T04:35:57+5:302021-05-05T04:35:57+5:30
मोहोळ तालुक्यात कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता त्यांच्यावर मोहोळ येथे उपचार होत नसल्याची खंत गेल्या महिनाभरापासून जाणवत ...
मोहोळ तालुक्यात कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता त्यांच्यावर मोहोळ येथे उपचार होत नसल्याची खंत गेल्या महिनाभरापासून जाणवत होती. कोरोना रुग्णांना उपचारासाठी सोलापूरशिवाय पर्याय नव्हता. याची दखल घेऊन सर्व सुविधांनी सज्ज असे कोविड हॉस्पिटल शहरातील ११ डॉक्टरांनी एकत्र येत शासकीय मान्यता घेऊन संजीवनी हॉस्पिटल या नावाने सुरू केले आहे.
यावेळी डॉ. शंकर दळवी-पाटील, डॉ. चेतन आयवळे, डॉ. प्रमोद पाटील, डॉ. शैलेश झाडबुके, डॉ. सुनील लवटे, डॉ. वशिम शेख, डॉ. मनोज देवकते, डॉ. अमोल हराळे, डॉ. मिलिंद लामगुंडे, डॉ. स्मिता पाटील, डॉ. अमोल लांडे, डॉ. सागर फाटे आदी उपस्थित होते.
फोटो
०३मोहोळ-कोविड हॉस्पिटल
कोरोना बाधित रुग्णांसाठी खासगी कोविड हॉस्पिटलच्या शुभारंभप्रसंगी तहसीलदार जीवन बनसोडे, मुख्याधिकारी एन. के. पाटील आदी.