सुस्तेत चुलत बहिणी आमने-सामने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:09 AM2021-01-08T05:09:48+5:302021-01-08T05:09:48+5:30
सुस्ते येथील प्रभाग क्र. १ हा वाॅर्ड अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे. २०१० च्या ...
सुस्ते येथील प्रभाग क्र. १ हा वाॅर्ड अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे. २०१० च्या निवडणुकीत भीमा-विठ्ठल परिवाराचे तात्यासाहेब नागटिळक यांच्या पत्नी सुजाता नागटिळक यांना ७० मते पडल्याने त्यांच्याविरुद्धच्या तुषार चव्हाण ७५ मते मिळवून निवडून आले होते.
मागील पंचवार्षिक निवडणुकीत परिचारक गटाचे बाजार समितीचे सभापती दिलीप घाडगे यांचे बंधू अनिल घाडगे हे १९८ मतांनी निवडून आले होते. यावर्षी हा वाॅर्ड अनुसूचित जमातीचा पुरुष व सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असल्याने घाडगे व युवा सेनेच्या अंबिका ग्रामविकास आघाडीतून सोसायटीचे उपाध्यक्ष संभाजी चव्हाण यांच्या पत्नी ललिता चव्हाण यांना उमेदवारी दिली आहे. त्यांची चुलत बहीण सप्तशृंगी पतसंस्थेचे अध्यक्ष अतुल चव्हाण यांची भावजय हणमंत चव्हाण यांची पत्नी राणी चव्हाण या भीमा-विठ्ठल परिवाराच्या श्री अंबिका महाविकास परिवर्तन आघाडीतून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत.
घाडगे गट व युवासेनेच्या अंबिका ग्रामविकास आघाडीतून प्रभाग क्र. १ : मारुती शेजाळ, ललिता चव्हाण, प्रभाग क्र. २ : अनिल घाडगे, सुनंदा चव्हाण, मनीषा कोळी, प्रभाग क्र. ३ : शकील तांबोळी, मंगल चव्हाण, रेखा लोखंडे, प्रभाग क्र. ४ : बाळासाहेब लोकरे, विशाल कसबे, राजाबाई सुळे, प्रभाग क्र. ५ : दत्तात्रय बोबडे, ज्योत्स्ना फडतरे तर भीमा-विठ्ठल परिवाराच्या श्री अंबिका महाविकास परिवर्तन आघाडीतून प्रभाग क्र. १ : विष्णू गावडे, राणी चव्हाण, प्रभाग क्र. २ : पांडुरंग कदम, स्नेहा बोबडे, जुबेदा शेख, प्रभाग क्र. ३ : ऊर्मिला चव्हाण, नंदाबाई वायदंडे, आदम मुलाणी, प्रभाग क्र. ४ : तुषार चव्हाण, अजिंक्य वाघमारे, जुबेदा शेख, प्रभाग क्र. ५ : बालाजी नागटिळक, कांताबाई रणदिवे आदी उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
नेतेमंडळींच्या प्रतिष्ठा पणाला लागल्याने प्रत्येक प्रभागातील मतदार याद्यांचे वाचन करून मतदारांच्या गाठीभेटी घेणे सुरू केले आहे.
-----