सर्वपक्षीय नेत्यांची सरशी..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:15 AM2021-07-24T04:15:32+5:302021-07-24T04:15:32+5:30
बार्शी तालुक्याच्या राजकारणात राऊत अन् सोपल या पारंपरिक गटात मागील वीस वर्षांपासून प्रत्येक निवडणुकीत कांटे की टक्कर पाहावयास मिळतेय. ...
बार्शी तालुक्याच्या राजकारणात राऊत अन् सोपल या पारंपरिक गटात मागील वीस वर्षांपासून प्रत्येक निवडणुकीत कांटे की टक्कर पाहावयास मिळतेय. या प्रमुख गटासोबत बारबोले, आंधळकर अन् मिरगणे यांनाही मानणारे कार्यकर्ते सक्रिय. सध्या मिरगणे अन् राऊत हे भाजपत. मात्र या दोघात वितुष्ट. त्यामुळे मिरगणे हे भाजपमध्ये असले तरी स्थानिक पातळीवर मात्र सोपल- आंधळकर यांच्यासोबत. परवा झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात ते उपस्थित राहिले नाहीत. त्या मेळाव्यात बोलताना आंधळकरांनी सांगितलं की मिरगणे हे आज पक्षीय कार्यक्रमामुळे येऊ शकले नाहीत, मात्र ते आपल्यासोबतच. दरम्यान, दोनच दिवसांनी फडणवीसांच्या वाढदिवसाला लावलेल्या फलकात मिरगणेंनी थेट भाजप-आरएसएमच्या नावाचा उल्लेख केला. एकंदरीत मिरगणे हे नेमके भाजपमध्ये की शिवसेनेच्या सोपलांसोबत, याची शहरात उलट सुलट चर्चा. नाहीतरी बार्शीच्या राजकारणात सध्या सर्वपक्षीय नेत्यांचीच वर्दळ. निवडणुकीला चिन्ह बदलणारे सोपल काय अन् पक्ष बदलणारे राऊत काय.. या दोन मुख्य नेत्यांच्या खिशाला कधीच कायमस्वरूपी एका पक्षाचा बिल्ला नसतो. मग बाकीच्यांची गोष्टच वेगळी.
- शहाजी फुरडे-पाटील
मिरगणे आणि आंधळकर फोटो